Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: धनकवडी पोलीस चौकीतच दोन कुटुंबांमध्ये राडा; मारहाण अन् शिवीगाळ करत फोडल्या पोलीस चौकीच्या कुंड्या, प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 October 2025, 21:12
Pune Crime: Fight between two families at Dhankawadi police post; Police post gates were broken while being beaten and abused, what is the matter?

Photo-Social Media

पुणे: धनकवडी परिसरात (Pune Crime) रविवारी रात्री पोलिस ठाण्यातच (Pune News) गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना घडली. भांडण करणाऱ्या दोन कुटुंबांना समजावण्यासाठी पोलिसांनी चौकीत आणले होते; मात्र तेथेही या महिलांनी पोलिसांना न जुमानता पुन्हा भांडणास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्यांनी पोलिस चौकीतील झाडांच्या कुंड्यांची तोडफोड करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. अखेरीस सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलीस हवालदार जयश्री नितीन शेळके (वय 37) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, लता अरुण कसबे (वय 51, रा. पार्वती कुंज अपार्टमेंट, सावरकर चौक, धनकवडी), करिश्मा चेतन नेटके (वय 26, रा. नेटके कॉलनी, विकासनगर, देहु), अश्विनी अशोक शेलार (वय 42), किमया अशोक शेलार (वय 21), भुमी अशोक शेलार (वय 18) आणि वेदांत अशोक शेलार (वय 20, सर्व रा. सावरकर चौक, धनकवडी) यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा व मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील असा की, रविवारी रात्री साधारण आठ वाजता लता कसबे या धनकवडी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. तक्रार नोंदवल्यानंतर त्या निघून गेल्या. काही वेळाने त्या पुन्हा चौकीत येऊन आपल्या नातीला शेजारील महिला अश्विनी शेलार व त्यांच्या मुलींकडून शिवीगाळ झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बीट मार्शल घटनास्थळी गेले व शेलार कुटुंबातील सदस्यांना चौकीत आणले.

दोन्ही कुटुंबांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. मात्र समेट घडवून आणण्याऐवजी दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. थोड्याच वेळात महिलांनी एकमेकींवर शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की सुरू केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने चौकीतील झाडांच्या कुंड्यांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले.

या गोंधळात पोलिसांनी शेलार कुटुंबातील महिलांना एका बाजूला घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान किमया शेलार हिला अचानक चक्कर येऊन ती खाली कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध भादंवीसह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेमुळे धनकवडी परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच भांडण घडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, अशा घटनांमुळे पोलिसांची कोंडी होत असल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Pune Police Bharati: Conflict over post allocation in Pune Police Force; Constable recruitment process stalled, how many new posts in Pune?

Pune Police Bharati: पुणे पोलिस दलातील पदवाटपावरून संघर्ष; शिपाई भरतीची प्रक्रिया रखडली, पुण्याची नवीन पदे किती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.