लोणी काळभोर: कुंजीरवाडी हद्दीत सुरू (Pune Crime) असलेल्या जुगार अड्ड्यावर (Pune News) गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी छापा टाकून तीन जुगाऱ्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

दत्ता तानाजी चव्हाण (वय 30, रा. गराडे वस्ती, यवत, ता. दौंड), पांडुरंग गहिनीनाथ काशिद (वय 36, रा. रमणबाग पॉल्टिंग, नायगाव रोड, कुंजीरवाडी, ता. हवेली), भाऊ तानाजी खलसे (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 6 हजार 320 रुपयांचे जुगार खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 6 चे अधिकारी व अंमलदार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात च्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कुंजीरवाडी गावच्या हद्दीत राईज अँड शाईन नर्सरी जवळ मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आरोपींना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई उपपोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने केली आहे.







