Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री अजित पवार

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 13 July 2025, 18:33

पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, या भागात पावसामुळे साचणारे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न व वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणाना दिल्या.

 

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील समस्या व पुणे मेट्रो लाईन तीन च्या कामाची पाहणी पवार यांनी आज केली पाहणी केल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार शंकर मांडेकर, विभाग आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, मुख्य अभियंता श्रीमती रिनाज पठाण, एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्याधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या परिसरातील कचऱ्याची समस्या तात्काळ दूर करून ज्या भागात कचरा साचला आहे तो तात्काळ उचलण्यात यावा, आयटी पार्कच्या परिसरात असलेले ओढ्यांचे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून तेथे अतिक्रमण करण्यात आले आहे ते अतिक्रमण तात्काळ संबंधित यंत्रणांनी काढून ओढे स्वच्छ करून त्याचे नैसर्गिक स्त्रोत मोकळे करावे, या भागातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता नव्याने सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने बांधकाम आराखडा तयार करावा. या कामासाठी महसूल प्रशासन एमआयडीसी, जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी व स्थानिक लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माण ग्रामपंचायत हद्दीत माण देवीच्या मंदिरालगत असलेल्या ओढ्यावरील बांधकामाचे अतिक्रमण जिल्हा परिषदेने तात्काळ हटवावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मेट्रो कार शेड जवळ असलेल्या लक्ष्मी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. लक्ष्मी चौकात पिंपरी येथील भक्ती शक्ती स्थळासारखे स्थळ उभाराच्या दृष्टीने नियोजन करावे, रिंग रोड वनजमिनीच्या प्रस्तावाबाबत सर्वोच्च प्राधान्याने काम करावे. तसेच कॅपजेमिनीजवळ पर्यायी रस्ता बनवावा.

नैसर्गिक ओढे नाल्याभोवती अतिक्रमण तसेच प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. पाणी, पूर समस्या सोडवण्यासाठी नेमण्यात आलेल्या टंडन शहरी सल्लागाराने अभ्यास करुन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा तसेच पाटबंधारे विभागाने सुद्धा तात्काळ अहवाल सादर करावा या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

हिंजवडी भागात कितीही पाऊस झाला तरी येथे पाणी साचता कामा नये असे काम झाले पाहिजे. त्या दृष्टीने कामाचे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.