Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Solapur Accident : सोरतापवाडीत डिव्हायडरला दुचाकी धडकून 51 वर्षीय मजुराचा मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 3 March 2026, 10:26

 

 

Pune Solapur Accident : उरुळी कांचन, ता. 03 : पुणे – सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Accident) भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर एच.पी. पेट्रोलपंपाजवळ ही घटना रविवारी (ता. 01) दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

जगन्नाथ शरणअप्पा रेड्डी (वय 51, व्यवसाय मजुरी, मूळ रा. मगरवस्ती, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, सध्या रा. सोरतापवाडी, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा अक्षय जगन्नाथ रेड्डी (वय 24, व्यवसाय जमीन खरेदी-विक्री, रा. सोरतापवाडी) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय रेड्डी हे कुटुंबासोबत एकत्र राहतात व जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची आई नर्सरीमध्ये काम करते, तर वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी दुपारी सुमारे 3.30 वाजता जगन्नाथ रेड्डी यांनी देवकर एचपी पेट्रोलपंप, सोरतापवाडी येथून एमएच 12 डब्ल्यू एम 7499 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीत पेट्रोल भरले व कुंजीरवाडीच्या दिशेने निघाले. दरम्यान, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या मधील दुभाजकाला जोरात धडकली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तात्काळ उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक तपासात दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बीएनएस कलम 181, 125(ब), 106, 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

Pradhan Mantri Awas Yojana 2026: लाभार्थी यादी पाहण्यासाठी सरकारने सुरू केली ऑनलाईन सुविधा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.