Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Shocking News: पुण्यातील भयंकर प्रकार! लग्नाचं खोटं नाटक अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जबरदस्ती मंगळसूत्र घातलं अन् नराधमाने खोलीत नेऊन…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 March 2026, 16:41
Pune Shocking News: Horrible incident in Pune! Fake wedding drama and torture on minor girl; Mangalsutra was forcibly put on and the man took her to a room...

पुणे: ठाणे चाईल्ड हेल्पलाईनने वेळीच हस्तक्षेप करून (Pune Shocking News) रोखलेला एक बालविवाह, दुर्दैवाने कौटुंबिक हट्टामुळे एका भीषण गुन्ह्यात रूपांतरित झाला आहे. चाईल्ड हेल्पलाईनला (Pune Crime) चकवा देऊन अल्पवयीन मुलीला गावी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी अतुल दादा झेंडे (वय २३, रा. लोणंद, जि. सोलापूर) या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीचा विवाह अतुल झेंडे याच्याशी लावून दिला जाणार होता. मात्र, ठाणे चाईल्ड हेल्पलाईनला या बेकायदेशीर विवाहाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखला होता. प्रशासनाने मुलीची सुटका केली होती, मात्र आरोपीच्या कुटुंबीयांनी कायद्याला धाब्यावर बसवून वेगळीच चाल खेळली.

नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपी अतुल झेंडेचे वडील पीडित मुलीला आपल्या लोणंद येथील घरी घेऊन गेले. तिथे तिला सक्तीने मंगळसूत्र घालण्यास लावले आणि तुमचे लग्न झाले आहे, असे सर्वांना सांगण्यास भाग पाडले. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, आरोपी अतुल झेंडे याने नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले.

या नरकयातनेतून सुटका करून घेत पीडित मुलीने अखेर पुण्याच्या बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्यावर झालेला अन्याय सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आणि आरोपी अतुल झेंडे याला सोलापूर जिल्ह्यातून अटक केली आहे.

सध्या बाणेर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. चाईल्ड हेल्पलाईनने एकदा लग्न रोखल्यानंतरही मुलीला पुन्हा त्याच जाळ्यात ढकलणाऱ्या नातेवाईकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे बालविवाह रोखणाऱ्या यंत्रणांच्या मर्यादा आणि पालकांची मानसिकता यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News: आधी लग्नाचं आमिष मग ‘श्रेया’ने केलं कॅन्सरचं नाटक; तरीही लग्नास तयार असलेल्या प्रतिकसोबत घडलं भयंकर

Sunday, 5 April 2026, 8:14

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे; सूर्याचा प्रकोप वाढला, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

Sunday, 5 April 2026, 7:50

Daily Horoscope: रवी देवांची मोठी कृपा! 5 एप्रिलला ‘या’ राशींचे नशीब पालटणार; तुमच्या खिशात येणार का पैसा? वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 5 April 2026, 7:38

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45
Next Post

Uruli Kanchan News: उरुळी कांचन पोलिसांचा जुलमी न्याय, अपघातातील जखमीलाच गुन्ह्याची धमकी! नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.