पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील (Pune Politics) राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्धच भारतीय जनता पक्षाची मुख्य लढाई असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune Mahapalika Election) निवडणुकीचे वातावरण (Ajit Pawar) चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाल्याने प्रचाराला वेगळाच रंग चढला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Latest Marathi News)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमधील प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचना देत पॅनेलच्या बाहेर जाऊन कोणीही प्रचार करू नये, स्वतंत्रपणे शायनिंग मारू नये आणि कोणतीही सेटिंग करू नये, अशी तंबी दिली. पॅनेलमधील उमेदवारच निवडून आणायचे आहेत, असे सांगत त्यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना थेट इशारा दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख चेहरा मानले जाणारे नाना काटे यांच्याविरोधात थेट निवडणूक लढवणे शत्रुघ्न काटे यांनी टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाना काटे हे पिंपळे सौदागरमधील प्रभाग क्रमांक 28 मधून निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात उभे राहण्याचे शत्रुघ्न काटे यांनी मुद्दाम टाळले, अशी कुजबुज आहे. याच पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांच्या सूचनांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना गेल्या पाच वर्षांत भाजपने पिंपरी-चिंचवड शहरात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेसमोर मांडण्याचे आदेश दिले. केंद्र आणि राज्य सरकारकडून शहराला शेकडो कोटींचा निधी मिळाल्याचे सांगत, शहरातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यात भाजप सरकार यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. काही लोक आमच्याविरोधात प्रचार करत असले तरी आपली कामगिरीच जनतेच्या मनावर ठसवा, असे आवाहनही त्यांनी केले.
हिंदुत्वाची विचारसरणी आणि विकासकामे या दोन्हींच्या जोरावर भाजप पुढे जात असल्याचे सांगत, हिंदू असल्याचा अभिमान बाळगण्याची रग भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे मत रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडमध्ये ही निवडणूक येत्या काळात अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.







