पुणे: महानगरपालिकांच्या निवडणुका (Pune Politics) अवघ्या काही दिवसांवर येऊन (Pune Mahapalika Nivadnuk) ठेपल्या असून 15 जानेवारी रोजी (Mahayuti) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर (Pune Electiom) राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीने (Rashtrawadi) राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र (Ajit Pawar) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला (Eknath Shinde) नाही. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (Pune Election) जागांवरून सुरू असलेला वाद कायम असतानाच आता पुण्यातही महायुतीत बिनसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. (Latest Marathi News)

बैठक अर्ध्यावर सोडली
पुण्यात जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक सुरू असताना शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले. महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि धूसफूस लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात ते चव्हाट्यावर आले आहेत. पुण्यातील बैठकीदरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे संतप्त होऊन बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट बैठकस्थळ सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जागावाटपावरून तिढा
पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक सुरू असताना हा प्रकार घडला. युती म्हणून जागावाटप होत असताना शिवसेनेवर अन्याय होत असल्याची भावना पक्षातील काही नेत्यांमध्ये असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेतील नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे.
मुंबईतही बैठकीत तणाव
दरम्यान, दुसरीकडे ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजपच्या कार्यालयात जिल्हा पातळीवरील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक मध्यरात्रीपासून सुरू होऊन पहाटे 4 वाजेपर्यंत चालली. तरीही ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील जागावाटपावरून दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेली ओढाताण थांबलेली नाही.
ठाकरे बंधूंची युती
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीने राजकीय समीकरणांना नवे वळण दिले असताना महायुतीमध्ये मात्र जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचं टेन्शन वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.







