पुणे: पुणे महानगरपालिका (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील (Sharad Pawar) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांकडून (Ajit Pawar) हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या युतीबाबत चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे वक्तव्य (Pune NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या युतीची अधिकृत घोषणा 26 तारखेला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

कार्यकर्त्यांशी संवाद
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. सध्या विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मी स्वतः यावर खुलासा करेन, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या मुंबईत अजित पवार आढावा बैठक घेणार असून त्यानंतर 26 तारखेला युतीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत असताना, संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
पक्ष सोडण्याची शक्यता
काही इच्छुक उमेदवार पक्ष सोडण्याची शक्यता असल्याने 26 तारखेचा मुहूर्त निवडण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रशांत जगताप यांचा राजीनामा
याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास त्यांनी केलेला स्पष्ट विरोध त्यांना भोवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे पुण्यातील राजकारण अधिकच रंगतदार बनले आहे.







