Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात दोन आठवडे बेपत्ता असलेल्या तरुणाचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले, नेमकं काय घडलं…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 10:35

Pune News: पुणे : पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात दांडी मारल्याबद्दल वडिलांनी जाब विचारल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाने घर सोडल्याची घटना घडली आहे. आळंदी रस्त्यावरील राजीव गांधीनगर भागातून हा मुलगा बेपत्ता (Missing) झाला असून, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

हेही वाचा- आकुर्डीत पोलिसांचा सापळा! महिलांना ढाल बनवून चालला होता कोट्यवधींचा खेळ, पण नशिबाने दिली हुलकावणी

घर सोडून गेलेल्या मुलाचे नाव योगेश श्याम दुनघव वय १६ असे आहे. तो खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. योगेश गेल्या दोन आठवड्यांपासून नियमितपणे महाविद्यालयात जात नसल्याचे त्याच्या वडिलांच्या लक्षात आले होते. याबाबत त्यांनी योगेशला विचारणा केली असता, तो क्रिकेट खेळण्यासाठी कॉलेजला दांडी मारत असल्याची कबुली त्याने दिली.

या कारणावरून वडिलांनी योगेशला समज देत जाब विचारला. वडिलांनी रागावल्याचा राग मनात धरून योगेशने कोणालाही काहीही न सांगता घर सोडले. तो बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे आणि परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, योगेशचा कुठेही पत्ता लागला नाही.

अखेर कुटुंबीयांनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तांत्रिक तपासाच्या मदतीने योगेशचा शोध सुरू आहे. मुलगा सुरक्षित सापडावा यासाठी पोलिसांकडून सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी योगेशबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ येरवडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

भीमथडी जत्रेत चोरट्यांचा डल्ला! गर्दीचा फायदा घेत बचत गटाच्या महिलेची कष्टाची कमाई लांबवली; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.