Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी स्टेशन चौकात ‘वाहतूक पोलीस पूर्णवेळ उपस्थित असल्याचे कळवा आणि रोख बक्षीस मिळवा’ अशी परिस्थिती; कोंडी सोडवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी?

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 April 2026, 13:51

Pune News : लोणी काळभोर, ता. 9 : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी इतकी भीषण झाली आहे की, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होताना दिसत आहे. दररोज तासन्तास वाहनांच्या रांगा, प्रचंड विलंब, धूळ-प्रदूषण आणि मानसिक ताण यांचा सामना करत प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. मात्र, एवढ्या गंभीर परिस्थितीतही वाहतूक नियंत्रणासाठी जबाबदार असलेली पुणे शहर पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याचे चित्र समोर येत आहे.

 

दरम्यान, लोणी स्टेशन चौकातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. येथे वाहतूक पोलीस क्वचितच कर्तव्य बजावताना दिसतात. त्यामुळे “लोणी स्टेशन चौकात पोलीस पूर्णवेळ कर्तव्य बजावत असल्याचे आम्हाला कळवा आणि रोख रकमेचे बक्षीस मिळवा,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या चौकात पोलीस कधीही येतात आणि कधीही निघून जातात, त्यामुळे सरकारला अशा प्रकारची योजना राबवावी लागणार नाही ना, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर गाडीतळ, मांजरी फार्म, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन चौक, एमआयटी कॉर्नर, थेऊर फाटा आणि कुंजीरवाडी (नायगाव चौक) या प्रमुख ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागतात. यामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन सेवांवरही याचा गंभीर परिणाम होत असल्याने परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे.

एकीकडे वाहतूक नियंत्रणाचा पूर्ण बोजवारा उडालेला असताना, दुसरीकडे काही ठिकाणी पोलीस कारवाईच्या नावाखाली केवळ पावत्या फाडण्यात आणि वसुलीतच व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात असली, तरी अवैध वाहतूक तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करून थांबणाऱ्या रिक्षांवर मात्र कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी नागरिकांच्या अडचणींमध्ये अधिक भर पडत आहे.

“वाहतूक पोलिसांनी आपली जबाबदारी विसरली आहे का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ कागदी कारवाई आणि दंडात्मक मोहिमा राबवून वाहतूक समस्या सुटणार नाहीत, याची जाणीव प्रशासनाने ठेवणे आवश्यक आहे. “आधी कोंडी सोडवा, मग दंड करा,” अशी स्पष्ट मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, वाहतूक पोलीस चौकात नियमितपणे उपस्थित नसल्याने पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतुकीची पूर्णपणे विस्कळीत अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तत्काळ रस्त्यावर उतरून नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे ढासळू शकतो. प्रशासन आता तरी जागे होणार का, की ‘कोंडी’ हीच लोणी काळभोरची ओळख बनणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव व हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

पोलीस प्रशासनाला जाग येणार का?
लोणी स्टेशन चौकात एक नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही शाळा दुपारी सुमारे अडीच वाजता सुटते. त्यानंतर विद्यार्थी सोलापूर महामार्ग ओलांडण्यासाठी चौकात येतात. अशावेळी तेथे वाहतूक पोलीस उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात पोलीस नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच पोलीस प्रशासनाला जाग येणार का, असा गंभीर सवाल लोणी काळभोर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

Wednesday, 15 April 2026, 19:07

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 18:23

पुणे जिल्हा परिषदेचे “मिनी मंत्रालय” कार्यान्वित होणार! उद्या विषय समित्यांचे वाटप आणि 83 सदस्यांची निवड

Wednesday, 15 April 2026, 17:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकला; छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापाची लाट

Wednesday, 15 April 2026, 17:43
Yawat

Yawat : वरवंडमध्ये घराच्या बांधकामावरून पती-पत्नीसह नातेवाईकांना मारहाण; दोन जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Wednesday, 15 April 2026, 17:39

मीरा-भाईंदरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 5 जणांशी लग्न करून केली लाखोंची फसवणूक

Wednesday, 15 April 2026, 17:16
Next Post

तरुणांनो सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकार देणार दरमहा मोठी संधी; 'मुख्यमंत्री फेलोशिप 2026' जाहीर, असा करा अर्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.