Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune-Manmad Train: पुणे-मनमाड प्रवासाचा वेळ घटणार! रेल्वेने अवघ्या 35 दिवसांत टाकले अत्याधुनिक 550 ‘जीएमटी’चे नवीन रूळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 December 2025, 14:36
Train Ticket Refund

photo- social media

पुणे: पुणे-मनमाड या अतिशय वर्दळीच्या रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा वेग (Pune-Manmad Train) सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उच्च दर्जाचे नवीन रूळ टाकण्याचे (Pune-Manmad Railway) काम सुरू केले आहे. हे नवीन रूळ 550 जीएमटी म्हणजेच तब्बल 55 कोटी टन वजन सहन करण्याची क्षमता असलेले आहेत. त्यामुळे (Pune News) या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे.(Latest Marathi News)

 

पुणे रेल्वे विभागात पुणतांबा ते कन्हेगाव स्थानकांदरम्यान सध्या हे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी ‘पीक्यूआरएस’ म्हणजेच प्लेसर क्विक रिलेइंग सिस्टीम या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद न करता, ठराविक कालावधीसाठी ब्लॉक घेऊन हे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 35 दिवसांत सुमारे 9 किलोमीटर लांबीचे रूळ बदलण्यात रेल्वेला यश आले आहे.

यापूर्वी या मार्गावर 52 किलो वजनाचे रूळ वापरले जात होते. आता त्यांच्या जागी 60 किलो वजनाचे अधिक मजबूत आणि टिकाऊ रूळ बसवण्यात येत आहेत. त्यामुळे रुळांची गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या सुधारणेमुळे सध्या ताशी 110 किलोमीटर असलेला गाड्यांचा सरासरी वेग भविष्यात 130 किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार असून पुणे-मनमाड प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.

तसेच, अल्ट्रासॉनिक टेस्टिंगसारख्या आधुनिक तपासणी पद्धतीमुळे रुळांमध्ये होणारे सूक्ष्म तडे वेळेत ओळखता येणार आहेत. त्यामुळे रूळ तुटून होणाऱ्या अपघातांची शक्यता कमी होईल. अवजड मालगाड्यांमुळे रुळांवर येणारा ताणही या नव्या रुळांमुळे कमी होणार आहे. एकदा हे नवीन रूळ पूर्णपणे बसवले की पुढील 15 ते 20 वर्षे या मार्गावर पुन्हा रूळ बदलण्याची गरज भासणार नाही. यामुळे देखभाल खर्च कमी होईल आणि गाड्यांचे वेळापत्रक अधिक अचूक ठेवणे रेल्वेला शक्य होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post
Crime News

Crime News : 2 मित्रांचा अजब प्लॅन फसला; बोकड चोरी करून थर्टी फर्स्ट साजरी करणं पडलं महाग! CCTV व्हिडिओ अन्... खेळ खल्लास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.