पुणे: डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही 1936 साली स्थापन (Pune Land Scam) झालेली संस्था असून पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मौल्यवान जागेवरून (Pune Mundhwa Scam) आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या संस्थेच्या (Ajit Pawar) अर्ध्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय (Parth Pawar) उभे असल्याचा मुद्दा माहिती (Sunetra Pawar) अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. धर्मादाय आयुक्तांनी ही Vijay Kumbhar) जागा केवळ भाड्याने देण्यास परवानगी दिली असताना प्रत्यक्षात ती जागा विकली गेल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या इमारतीबाबतच हे आरोप करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

विजय कुंभार यांच्या म्हणण्यानुसार, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनने जागा विकसित करण्यासाठी साहिल प्रधान या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. हाच साहिल प्रधान मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यातील कराराचा साक्षीदार आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा अप्रत्यक्ष सहभाग दिसून येतो, असा दावा कुंभार यांनी केला. ही जागा कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीने विकसित केली असून त्या कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार काही इतर कंपन्यांमध्ये एकत्र संचालक असल्याचाही आरोप करण्यात आला.
या जागेसाठी 60 वर्षांचा भाडेकरार करण्याची परवानगी होती. मात्र प्रत्यक्षात 2017 पासून ती जागा विकसित करून विकण्यात आली. चार एफएसआय वापरून 13 मजली इमारत उभारण्यात आली आणि सुमारे 63000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा तयार झाली. खालच्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असून वरचे मजले विकण्यात आले. या प्रकरणात भाजपने कारवाई न केल्यामुळे तेही सहभागी असल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची स्थापना साखर उद्योगासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. शेठ लालचंद हिराचंद आणि वालचंद हिराचंद यांच्या पुढाकारातून ही संस्था उभी राहिली. 1936 ते 1950 या काळात वालचंद हिराचंद संस्थेचे अध्यक्ष होते. 1965 साली संस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते, तर 2011 साली बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी केले होते. आज हीच संस्था आणि तिची जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.







