Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: धक्कादायक! शेअर मार्केटमध्ये बुडाले पैसे अन् राग सुनेवर काढला; ती घरात येताच सासऱ्याने नको ते केलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 January 2026, 14:56
Pimpari-Chinchwad Crime: Attempt to kill wife for not picking up phone; Case registered against husband

Pune Crime:  पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघा एक महिना होत नाही तोच हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ (Dowry Case) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमधील (Share Market) तोटा भरून काढण्यासाठी सासरच्या मंडळींनी या महिलेकडे पैशांची मागणी करत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

 

पीडित महिलेचा विवाह 24 नोव्हेंबर 2024 रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा संसार त्रासदायक ठरू लागला. पती राजदीप, सासरे प्रदीप आणि सासू हेमलता यांनी किरकोळ कारणांवरून तिला टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला अनेकदा उपाशी ठेवण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या वागणुकीमुळे तिचे मानसिक खच्चीकरण झाले होते.

सासरच्या मंडळींना शेअर मार्केटमध्ये मोठा आर्थिक तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी पीडितेच्या वडिलांकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. छळ सहन न झाल्याने पीडितेने वडिलांकडून 3 लाख रुपये आणून सासरच्यांना दिले. मात्र, एवढ्यावरही त्यांचे समाधान झाले नाही. दिवाळीच्या काळात पुन्हा पैशांची मागणी करत तिला माहेरी पाठवण्यात आले.

21 डिसेंबर 2025 रोजी पीडिता पुन्हा सासरी आली असता, पैसे आणले असतील तरच घरात ये, अशी धमकी देत तिला घरात प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी झालेल्या वादात सासऱ्याने तिला बेल्टने बेदम मारहाण केली, तर पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासूनेही या मारहाणीत साथ दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या हल्ल्यात पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Navneet Rana: "Throw Owaisi to Pakistan, go there and have 20 children!" Navneet Rana hits back at Asaduddin Owaisi; says "If you want to live here...

Navneet Rana: "ओवैसींना पाकिस्तानात फेका, तिथे जाऊन 20 मुलं करा!" नवनीत राणांचा असदुद्दीन ओवैसींवर पलटवार; म्हणाल्या "इथं राहायचं असेल तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.