पुणे: समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Pune Crime) शाळेतून ये-जा करणाऱ्या अल्पवयीन मुलींचा (Pune News) पाठलाग करून त्यांच्याकडे वाईट इशारे करणाऱ्या आणि मोबाईल नंबर मागून विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Breaking News)

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
आयान जानमहंमद शेख (वय 23, रा. नरपतगिरी चौक, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो एका सलूनमध्ये कारागीर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (Marathi News)
शाळेतल्या मुलींची काढली छेड
तक्रारीनुसार, 13 डिसेंबरपासून फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी आणि तिची मैत्रीण या शाळेत जात असताना तसेच शाळेतून घरी परत येत असताना आरोपी आयान शेख त्यांचा पाठलाग करत होता. रस्त्यावरून जाताना तो त्यांच्याकडे पाहून अश्लील आणि वाईट इशारे करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या त्रासामुळे दोन्ही मुली घाबरलेल्या अवस्थेत होत्या. (Marathi Batmya)
भररस्त्यात अडवलं
20 डिसेंबर रोजी शाळेतून घरी परत येताना आरोपीने पुन्हा या मुलींना अडवले. त्याने हाताने इशारे करत त्यांच्याकडून मोबाईल नंबर मागितला आणि त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर संबंधित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. (Breaking News)
अधिक तपास सुरु
तक्रार मिळताच समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. आरोपीविरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.







