पुणे: उसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या (Pimpri-Chinchwad News) रागातून धारदार हत्याराने कामगाराचा (Pune Crime) गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना भोसरीतील बैलगाडा घाट परिसरात सोमवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका आरोपी कामगाराला मुंबई येथून ताब्यात घेतले असून परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

आरोपी मुंबईतून ताब्यात
दीपककुमार प्रजापती (वय 40, रा. शांतिनगर, भोसरी) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ राहुलकुमार प्रजापती (वय 29, रा. शांतिनगर, भोसरी, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विष्णू प्रजापती (वय 26, रा. शांतिनगर, भोसरी, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. (Breaking News)
पोलिसांची माहिती
भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपककुमार प्रजापती हे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी यांच्यासह शांतिनगर परिसरात राहत होते. ते इंद्रायणीनगर येथील सेक्टर 7 मधील एका खासगी कंपनीत काम करत होते. रविवारी सकाळी दीपककुमार हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत.
भररस्त्यात गळा चिरला
सोमवारी सकाळी सुमारे 7 वाजता भोसरीतील बैलगाडा घाट परिसरात गळा चिरलेल्या अवस्थेत दीपककुमार यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर भोसरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान धारदार हत्याराने गळ्यावर वार झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
पैशांवरून वाद
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि चौकशी करत विष्णू प्रजापती याने हा खून केल्याचे उघड केले. आरोपी विष्णू याने दीपककुमार यांना हातउसने पैसे दिले होते. ते पैसे परत न मिळाल्याने त्याच्या मनात राग होता. त्याच रागातून त्याने हेक्सा ब्लेडने दीपककुमार यांच्या गळ्यावर वार केला. खून केल्यानंतर तो मुंबईकडे पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.







