Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : कुंजीरवाडी यात्रेत चोरट्यांचा उच्छाद; 8 पेक्षा जास्त नागरिकांच्या सुमारे 10 तोळ्यांहून अधिक दागिन्यांवर मारला डल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 12:32

Pune Crime :  लोणी काळभोर, ता. 26 : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत कालभैरवनाथ यात्रेत बुधवारी (ता. 25) रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत महिला, लहान मुले व तरुणांच्या गळ्यातील चैन अशा अंदाजे 8 पेक्षा जास्त नागरिकांच्या सुमारे 10 तोळ्यांहून अधिक सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून लोणी काळभोर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, पर्स, लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे बदाम व कानातले, तसेच तरुणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या क्षणार्धात लंपास केल्या. काही महिलांना दागिने चोरीला गेल्याचे समजताच त्यांना धक्का बसला, तर काहींनी रडारड करत घटनास्थळीच संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे, यापूर्वीही कुंजीरवाडीतील काही मंगल कार्यालयांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. तरीदेखील यात्रेसारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त न ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे. ग्रामपंचायतीने यात्रेबाबतची पूर्वसूचना लोणी काळभोर पोलिसांना दिली होती, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात प्रभावी बंदोबस्त दिसून आला नाही, अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले, “ग्रामपंचायतीने सर्व तयारी केली होती. यात्रेची माहितीही पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात बंदोबस्त नव्हता. काही पोलीस येत-जात होते, पण गर्दीत थांबून नियंत्रण ठेवण्याचे काम झाले नाही. पोलीस ठाण मांडून उभे राहिले असते, तर इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या नसत्या.”

 

यात्रेत ज्यांचे दागिने चोरीला गेले आहेत, त्या सर्वांना एकत्र घेऊन आज दुपारी तीनच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेत महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच लक्ष्य करण्यात आल्याने ही टोळी सराईत असून नियोजनबद्ध पद्धतीने चोऱ्या करण्यात आल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडे संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सरपंच गोठे यांनी सांगितले.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वारंवार घडणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. यात्रेसारख्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमातच जर नागरिक असुरक्षित असतील, तर सामान्य दिवसांत काय परिस्थिती असेल, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

“कुंजीरवाडी येथील यात्रेदरम्यान पोलिसांचा आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीत काही चोरट्यांनी दागिने चोरी केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंदवून संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – लोणी काळभोर पोलीस ठाणे)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ येथे दोन ठिकाणी घरफोडी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp