Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: कुलूप तोडलं, आत शिरले, अन् कपाटातील ती पिशवी उचकताच चोरटे झाले मालामाल! पुण्यात नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 January 2026, 10:21

Pune Crime: पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली आहे अशातच पुन्हा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. भरवस्तीत असलेल्या एका बंद फ्लॅटचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 1 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला आहे. या धाडसी चोरीमुळे सहकारनगर परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

 

फिर्यादी संजय सदाशिव दिघे वय 55 हे धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटीमध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 12 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते घराबाहेर गेले होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटला लक्ष्य केले. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घराची पाहणी करताना ते थेट बेडरूममध्ये गेले.

दिघे यांनी बेडरूममधील कपाटाच्या वरच्या मोकळ्या जागेत एका पिशवीत 1 लाख रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. चोरट्यांनी कपाट उघडून तपासणी केली असता त्यांना ही पिशवी सापडली. पिशवी उघडताच त्यामधील पैसे पाहून चोरट्यांनी ती पिशवी उचलली आणि घटनास्थळावरून पसार झाले. घरात इतर कोणत्याही वस्तूंची चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आलेले नाही.

दिघे घरी परतल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे असून पैसे गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक असतानाही चोरट्यांनी घरफोडी केल्यामुळे रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त वाढवण्यात आली असतानाही अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या परिसरातील सराईत गुन्हेगारांची चौकशी करत असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00
Next Post

भाजपाचा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित - आमदार महेश लांडगे यांची भावूक प्रतिक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.