पुणे: वानवडी पोलिसांनी ज्येष्ठ (Pune Crime) नागरिकावरील जबरी चोरी प्रकरणाचा तपास (Pune News) करताना थेट खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे (Mangesh Kalokhe Murder) यांच्या खुनाचा उलगडा केल्याने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत फरार आरोपीला अटक केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिल्याने हा गंभीर गुन्हा उघडकीस आला. (Latest Marathi News)

12 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 07:30 वाजताच्या सुमारास हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला चार अनोळखी आरोपींनी अडवून मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले होते. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान उमर नूर खान आणि साहील हबीब फकीर यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली साखळी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार खालीद खलील कुरेशी हा फरार होता. 30 डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हांडेवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस कोठडीत सखोल चौकशीदरम्यान त्याने पुण्यातील आपल्या दोन मित्रांसह इतर आरोपींच्या मदतीने खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, विठ्ठल चोरमले, विष्णू सुतार, आशिष कांबळे, बाळाजी वाघमारे, अभिजीत चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड आणि अशरद सय्यद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.







