Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: नदीत उड्या आणि दोन रात्रींचा जीवघेणा पाठलाग! पुण्याच्या ‘त्या’ टोळीला पकडण्यासाठी पोलिसांची ‘फिल्मी’ स्टाईल कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 December 2025, 10:43
Kadamwakvasti: Three people were arrested by Loni Kalbhor police for carrying iron bars in Kadamwakvasti; Two-wheeler and valuables worth Rs 55 thousand were seized

Photo- Social Media

Pune Crime: पुणे : एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरार गेल्या ४८ तासांपासून पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाला. ज्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी आपलं जीव झोकून दिला आहे. त्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी कडाक्याच्या  थंडीत नदीत उड्या मारल्या.

 

हेही वाचा- पुणे पोलिसांचा मोठा ॲक्शन प्लॅन! नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्गांची संपूर्ण यादी

खडकवासला ते पानशेत रस्त्यावरील खानापूर परिसरात असलेल्या ‘वैष्णवी ज्वेलर्स’ या सराफी दुकानावर झालेल्या धाडसी दरोड्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 48 तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने कारवाई करत नदीत उडी मारून एका दरोडेखोराला पकडले. त्याच्यासह इतर साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या दरोड्यात आरोपींनी सराफी दुकानातून सुमारे 84 तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 5 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अंकुश दगडू कचरे आणि गणेश भांबु कचरे या दोन मुख्य आरोपींसह त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वैष्णवी ज्वेलर्समध्ये दरोडा

26 डिसेंबर रोजी दुपारी कोयते आणि तलवारीचा धाक दाखवून आरोपींनी वैष्णवी ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला होता. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि हवेली पोलीस ठाण्याची सहा विशेष पथके तपासासाठी तैनात करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींची ओळख पटली. तपासात आरोपी वेल्हे तालुक्याच्या दिशेने पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोन रात्री आरोपींचा पाठलाग केला. एका डोंगराळ भागात पोलिसांना पाहून दरोडेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. समोर नदी आल्याने त्यांनी दुचाकी सोडून पाण्यात उड्या घेतल्या. या वेळी पोलीस अंमलदार गणेश धनवे आणि सागर नामदास यांनीही कोणतीही भीती न बाळगता नदीत उडी मारली. गणेश धनवे यांनी वेगाने पोहत नदीचा पलीकडचा तीर गाठला आणि आरोपी अंकुश कचरे बाहेर येताच त्याला अटक करण्यात आली.

अटकेत असलेला अंकुश कचरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल आहेत. तपासात या टोळीने कात्रज येथून खानापूर येथे येऊन दोन ते तीन वेळा दुकानाची रेकी केल्याचे समोर आले आहे. दुकानातील गर्दी कमी असते, अशी दुपारची वेळ त्यांनी दरोड्यासाठी निवडली होती. पोलिसांनी या कारवाईत 70 लाख 32 हजार रुपयांचे सोने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि शस्त्रे जप्त केली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली असून आरोपींच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

New Year 2026 Quotes: व्हॉट्सॲपवर पाठवा 'हे' हटके मराठमोळे शुभेच्छा; साध्या मेसेजेसपेक्षाही ठरतील लय भारी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.