पुणे: राज्यात महापालिका (Pune Crime) निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात (Pune News) एक खळबळजनक घटना घडली आहे. कोंढवा परिसरात पोलिसांनी केलेल्या छाप्यात एका घरातून तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड सापडली असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवैध दारूविक्रीवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती हे मोठे घबाड लागले आहे. (Latest Marathi News)

पोलिसांच्या हाती रोकड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील काकडे वस्ती, गल्ली नंबर 2 येथे प्रतिबंधात्मक कायद्यान्वये एका घरावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान घरातील बंद कपाट तपासले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली. या घरातून देशी दारूच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचेही तपासात समोर आले आहे.
नोटा मोजून हात दुखले
कपाटातून सापडलेली रोकड 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही रक्कम इतकी मोठी होती की, नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बराच वेळ लागला. या कारवाईत पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
दारूसाठाही जप्त
या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूचा साठाही जप्त केला आहे. त्यामध्ये 50 ml चे 80 फुगे किमती 1,600 रुपये, 35 लिटरचे 2 कॅन म्हणजे एकूण 70 लिटर किमती 28,000 रुपये, नंबर 1 व्हिस्की 220 नग किमती 48,400 रुपये, आयबी व्हिस्की 183 नग किमती 40,260 रुपये, आर एस 180 ml 224 नग किमती 56,000 रुपये, आर एस 90 ml 20 नग किमती 2,800 रुपये, क्लासिक गोल्ड 32 नग किमती 4,800 रुपये, व्हॉल्कन ब्लू 38 नग किमती 6,080 रुपये, डर्बी स्पेशल 43 नग किमती 6,880 रुपये, ओल्ड मंक रम 48 नग किमती 10,320 रुपये आणि टँगो पंच 77 नग किमती 6,160 रुपये असा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत एकूण 2,05,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ऐन नाताळ आणि थर्टी फस्टच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि रोकड जप्त झाल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







