Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिवंत झुरळं अस्वच्छता अन् पुणेकरांच्या जीवाशी खेळ! पुण्यात FDAची धाड; वारजेतल्या डॉमिनोजच्या आऊटलेटचा परवाना रद्द

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 15 October 2026, 16:30

पुणे : मुलांच्या आवडीचा पिझ्झा तयार करणाऱ्या स्वयंपाकघरातच जिवंत झुरळं आणि मृत झुरळांचे अवशेष आढळल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वारजे येथील डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटची तपासणी केली असता स्वच्छतेसह अन्नसुरक्षेच्या नियमांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे या आउटलेटचा अन्न परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे. पुणे विभागातील २५ हून अधिक आउटलेट्सची तपासणी करण्यात आली असून, अन्य दोन ठिकाणीही गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी वारजे येथील मे. ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडच्या डॉमिनोज पिझ्झा आउटलेटची तपासणी केली. या वेळी स्वयंपाकघरात आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या जागेत जिवंत झुरळं तसेच मृत झुरळांचे अवशेष आढळले. अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी अशी अस्वच्छता आढळल्याने अन्नसुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तपासणीदरम्यान शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हाताळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे योग्य विभाजन नसल्याचेही समोर आले. अन्नपदार्थ स्वीकारतानाच्या तापमानाच्या नोंदी अपूर्ण होत्या. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणात त्रुटी आढळल्या, तर अन्नपदार्थांची साठवणूकही योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांसाठी असलेल्या जेवणाच्या जागेतील स्वच्छतागृहातून दुर्गंधी येत असल्याचेही तपासणीत नमूद करण्यात आले.

या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर एफडीएने वारजेतील आउटलेटचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला. पुणे विभागातील अन्य दोन आउटलेट्समध्येही त्रुटी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी न्यायनिर्णयनाची प्रकरणे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

या कारवाईमुळे हॉटेल आणि फास्ट फूड आउटलेट्समधील स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेषतः लहान मुलांना बाहेरचे पदार्थ खायला देताना पालकांनी अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अन्न तयार करणाऱ्या ठिकाणी स्वच्छता राखणे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे ही संबंधित आस्थापनांची जबाबदारी आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! तुमच्या पगाराबाबत मोठी माहिती समोर! ८व्या वेतन आयोगाची मोठी अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp