Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

20 लाखांची सुपारी अन् एका पराभवाचा बदला हत्येने; काळोखे हत्याकांड प्रकरणात पुणे कनेक्शन आले समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 4 January 2026, 12:54

पुणे: रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये माजी नगरसेवक मंगेश काळोखे (Crime News) यांची झालेली निर्घृण हत्या ही केवळ राजकीय वादातून नाही, तर 20 लाख रुपयांच्या सुपारीतून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. रायगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना पुण्यातून एका मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आणि या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. या खळबळजनक हत्याकांडात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या नावांची चर्चा होती, मात्र त्यांचा थेट सहभाग अद्याप समोर आलेला नाही.

 

या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचला गेल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर याने इशा पापा शेख हिच्या मदतीने कॉन्ट्रॅक्ट किलर्सना ही मोठी रक्कम दिली होती. पुण्याच्या हडपसर भागातून पोलिसांनी खालीद कुरेशी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कटात आदिल शेखसह इतर शूटरचाही समावेश होता.

26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी मंगेश काळोखे मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना हा हल्ला झाला. खोपोलीतील जया बार परिसरात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी कारमधून त्यांचा पाठलाग केला आणि तलवार, कुऱ्हाडीने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काळोखे यांच्या पत्नीने आरोपीच्या पत्नीचा पराभव केला होता, याच पराभवाचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपी रवींद्र देवकर, माजी नगरसेविका उर्मिला देवकर आणि त्यांच्या मुलासह एकूण 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. फरार असलेल्या एका आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कसुन तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

पैशांची हाव अन् बाळासाठी सासरच्यांकडून जाच; हडपसर येथील 22 वर्षीय विवाहितेने केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.