Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : बारामतीच्या सूर्यनगरीत ‘घरफोडी’ करणारा अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 February 2026, 13:34

Baramati Crime : बारामती दि. 22 : बारामती तालुक्यातील सूर्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या दोन घटना 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आणि 11 जानेवारी रोजी दुपारी घडल्या होत्या. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

फिर्यादी श्रीकांत अशोकराव बिरादार (वय 33, रा. सूर्यनगरी, बारामती) हे महावितरण शाखा सणसर येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाऊन सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी कपाटातील दागिने ठेवलेला कप्पा उघडा असल्याचे पाहिले. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत असून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच अंदाजे 10 हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

पत्नी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मुलाला खेळवण्यासाठी खाली रस्त्यावर घेऊन गेल्या असताना घराचा दरवाजा फक्त लावलेला होता. याच वेळेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केली आहे.

यामध्ये सोन्याचे मिनी गंठन (17.5 ग्रॅम) रु.50,000, सोन्याचे काप (8 ग्रॅम) रु.20,000, सोन्याचे एअररिंग (4 ग्रॅम) रु.10,000 दोन सोन्याच्या अंगठ्या (6 ग्रॅम) रु.10,000 चांदीचे पैंजण रु.1,000, रोख रक्कम रु.10,000 असा एकूण अंदाजे किंमत 2 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी भा.न्या. संहिता कलम 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेंद्र वामनराव चव्हाण (वय 48 वर्षे, व्यवसाय मेस, रा. सुमन रेसिडेन्सी, फ्लॅट नं. 3, सूर्यनगरी, ता. बारामती) यांच्या घरीही अशाच प्रकारची घटना घडून 35 हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली होती.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तांदुळवाडी (ता. बारामती) येथून ऋषिकेश विजय कोकाटे (वय 21, रा. अंबिका नगर, इंदापूर) याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील सोन्याचे दागिने सोनार श्रेयस विठ्ठल कुलथे (वय 25, रा. व्यंकटेश नगर, इंदापूर) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोनार कुलथे यालाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार केदारनाथ बिडवे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राहुल मखरे, सुरेश लांडगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्निल अहिवाळे, अभिजीत एकशिंगे यांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post
Bhigwan

Bhigwan : तक्रारवाडी स्मशानभूमी अंधारातच; पुनर्वसनानंतरही विजेची सोय नाही, अंत्यविधीवेळी मोबाईल टॉर्चचा आधार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.