पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांच्या विमान अपघातानंतर निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्रीय नागरी (Rohit Pawar) उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी या प्रकरणाची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIB कडे सोपवली आहे. AAIB ही देशातील विमान अपघातांची चौकशी करणारी स्वतंत्र आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्था असून ती थेट केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करत नाही. आवश्यक असल्यास (Ajit Pawar Death) ही संस्था आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदतही घेऊ शकते.

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर हा अपघात की घातपात, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या दुर्घटनेत अनेक विसंगती असल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर आता अधिकृतपणे AAIB चौकशी सुरू झाल्याने या मागण्यांना प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात आहे.
AAIB ची स्थापना देशात विमान दुर्घटनांची निष्पक्ष चौकशी व्हावी या उद्देशाने करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असताना या संस्थेची उभारणी झाली होती. विमान अपघातांमध्ये साधारणपणे दोन प्रमुख बाबींची तपासणी केली जाते – वैमानिकाची चूक किंवा विमानातील तांत्रिक बिघाड. मात्र, या प्रकरणात विविध राजकीय नेत्यांनी अधिक व्यापक चौकशीची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली होती. आता AAIB कडून तपास सुरू झाल्याने ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण, हवामान परिस्थिती, एअर ट्रॅफिक कंट्रोल संवाद आणि विमानाच्या देखभाल नोंदी यांचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. या चौकशीचा निष्कर्ष केवळ या दुर्घटनेमागील सत्य उघड करणार नाही, तर भविष्यातील उड्डाण सुरक्षेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.







