पुणे: श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग (Shri Mahalakshmi Devi Sarasbagh) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या दिवशी देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. दक्षिण भारतातील कारागिरांनी सहा महिन्यांच्या परिश्रमानंतर ही सोन्याची साडी साकारली आहे. एका भक्ताने देवीला ही साडी अर्पण केली आहे.

दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची पारंपरिक प्रथा असून त्यानुसार सोन्याच्या साडीत देवीचे दर्शन घेण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आकर्षक नक्षीकामासह साकारलेली ही सुवर्णसाडी देवीच्या अलंकारिक रुपाला अधिकच शोभा आणणारी ठरली आहे. या विशेष दर्शनासाठी पुणे तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

हेही वाचा: Gold Rate Today: किंमत पाहून थक्क व्हाल! दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदीचे दर काय? जाणून घ्या








