Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“अजित पवारांवर बोलण्याची माझी कुवत नाही” ; महेश लांडगे नरमले

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 11 January 2026, 11:33

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election: पिंपरी, ता. 11 : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय वाद चांगलाच वाढला होता. प्रचारादरम्यान आमदार लांडगे यांनी अजित पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने वातावरण तापले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आमदार लांडगे यांनी भूमिका बदलल्याचे दिसून आले.

 

आकुर्डी येथे झालेल्या सभेत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, “माझी आणि अजित पवार यांची उंची तुलना करता येणार नाही. ते राज्याचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर बोलण्याची माझी कुवत नाही.” या वक्तव्यामुळे त्यांच्या भूमिकेत नरमाई आल्याचे स्पष्ट झाले.

महापालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली, असे सांगत लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचा उल्लेख केला. रेडझोनचा प्रश्न मार्गी लावणे, प्राधिकरणाच्या 98 हजार मालमत्ता फ्री होल्ड करणे, 52 वर्षांनंतर साडेबारा टक्के परतावा देणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आणि न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत मंजूर करणे, ही सर्व कामे भाजप सरकारमुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्यावर झालेल्या आरोपांना आपण योग्य प्रकारे उत्तर दिले असल्याचे नमूद करत लांडगे म्हणाले, “महायुतीतील नेत्यांचा आदर फक्त भाजपनेच करायचा का? शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला असताना आम्ही संयम राखला. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मनापासून काम केले. भोसरीतून मोठे मताधिक्य दिले. तरीही आमच्याविरोधात खोटे कथानक पसरवले जात आहे.”

दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनेच्या माध्यमातून नागरिकांना धमकावले जात असल्याचा मुद्दा आमदार लांडगे यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत सांगितले की, “राज्यात कायद्याचे राज्य चालेल. एसआरएच्या नावाखाली धमक्या देणाऱ्यांना पोलिस योग्य उत्तर देतील. एसआरएचा अध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून मीच आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Politics

Politics : सत्ता येणार नाही हे ठाऊक म्हणूनच फसव्या घोषणा! चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर थेट हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.