Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PCMC General Body: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची नियुक्ती जाहीर; स्थायी समितीसह पाच विषय समित्यांची रचना निश्चित 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 21 February 2026, 15:31

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत स्थायी समितीसह पाच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पक्षीय संख्याबळानुसार विविध पक्षांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. (PCMC General Body)

 

पिठासीन अधिकारी या नात्याने महापौरांनी सदस्यांची नावे सभागृहात घोषित केली. शहराच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून नव्याने निवड झालेले सदस्य सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरच संबंधित समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.

समित्यांची रचना

स्थायी समितीबरोबरच विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली.

नावनिश्चिती प्रक्रियेदरम्यान भाजपच्या वतीने पक्षनेते प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनी आपापल्या पक्षातील सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांकडे सादर केली. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली.

स्थायी समितीत भाजपचे 11, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि शिवसेनेचा 1 सदस्य अशी रचना जाहीर झाली. इतर विषय समित्यांमध्येही पक्षीय प्रमाणानुसार सदस्यांची निवड निश्चित करण्यात आली.

कोणत्या समितीत कोणाला संधी?

स्थायी समिती

अभिषेक बारणे, संदीप कस्पटे, मनिषा चिंचवडे, शालिनी गुजर, सारीका गायकवाड, कृष्णा सुरकुले, योगिता नागरगोजे, शीतल वर्नेकर, बाबासाहेब त्रिभुवन, अर्चना करांडे, मधुरा शिंदे – (भाजप)

संदीप वाघेरे, संतोष कोकणे, विकास साने, सविता आसवानी (राष्ट्रवादी)

सुलभा उबाळे (शिवसेना)

विधी समिती

विनायक गायकवाड, ज्ञानेश्वर जगताप,  श्रुती डोळस, कुशाग्र कदम, कुंदा भिसे, सुजाता बोराटे (भा ज प)
तुषार सहाणे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप  (राष्ट्रवादी)

शिक्षण समिती

श्रुती वाकडकर, पल्लवी वाल्हेकर,  रविना आंगोळकर, सारिका बोऱ्हाडे, कविता भोंगाळे, रीटा सानप,  (भारतीय जनता पार्टी)
प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

शहर सुधारणा समिती

संजय (नाना) काटे, अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, उत्तमराव केंदळे, सुहास कांबळे (भा ज पा)

डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, वैशाली काळभोर, अनंत कोऱ्हाळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

महिला व बालकल्याण समिती

राणी पठारे, पल्लवी जगताप, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, नीता पाडाळे, सुप्रिया चांदगुडे (भारतीय जनता पार्टी)
मनिषा लांडे, निकिता कदम, सारिका मासूळकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

योगेश लांडगे, कैलास कुटे, तानाजी बारणे, शाम जगताप, उदय गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे (भारतीय जनता पार्टी)
भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

सभेला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर आणि इतर नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

नव्या समित्यांच्या स्थापनेनंतर आता शहरातील विविध प्रकल्प, धोरणे आणि कल्याणकारी उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

Friday, 1 May 2026, 21:09

पुणे ग्रामीण पोलीस दलातील ७ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

Friday, 1 May 2026, 18:43

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43
Next Post
Pune News

Pune News : ''नाही पटत, मग वेगळे होऊया!" पुण्यात २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये घटस्फोटांचा कल वाढला; न्यायालयातील 'ही' आकडेवारी पाहून तुम्हीही हादरून जाल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.