Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘भाजयुमो’ चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया व्हिजन’वर संवाद ; शहराध्यक्ष महेश लांडगे, युवा मोर्चाचे संकेत चोंधे यांचा पुढाकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 February 2023, 16:34

पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे सर्वात कमी वयाचे आणि व्हिजनरी तसेच उच्चशिक्षित खासदार म्हणून ओळख असलेले तेजस्वी सूर्या हे पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा करणार आहेत. रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शहरात येणार आहेत, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्‍यक्ष महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘युथ डॉयलॉग वुईथ तेजस्वी सूर्या’’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शहरातील उच्चशिक्षित नागरिक, तसेच आयटीयन्स यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया व्हिजन’बाबत जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच असते.

भारताची जागतिक पातळीवर ‘महासत्ता’ अशी ओळख निर्माण होत आहे. त्यामागे ‘न्यू इंडिया व्हिजन’ चे योगदान काय आहे? याबाबत पिंपरी-चिंचवडकरांना माहिती मिळावी. या करिता हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

 

पिंपळे सौदागर येथील कापसे लॉन्स येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी भाजपा युवा मोर्चा, भाजपा आयटी टीम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आयटी मिलन विभाग, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी पुढाकार घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील आयटीयन्स, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, डॉक्टर्स, वकील, सीए अशा उच्चशिक्षित रहिवाशांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘न्यू इंडिया व्हिजन’ विस्तृतपणे सांगण्यात येणार आहे. त्याद्वारे जगाच्या नकाशावर देशाची ओळख ‘बलशाली भारत’ अशी होत आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडकर कसे योगदान देवू शकतात? याबाबत तेजस्वी सूर्या मार्गदर्शन करणार आहेत.

‘‘लोकल टू ग्लोबल कनेक्ट वुईथ तेजस्वी सूर्या’’…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड ही ‘कॉस्मोपॉलिटीन सिटी’ म्हणून ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवडचा पहिल्या १० मध्ये क्रमांक लागतो.

‘स्मार्ट सिटी’मुळे राहण्यासाठी सर्वोत्तम शहर (इज ऑफ लिव्हींग) म्हणून आपली उद्योगनगरी विकसित होत आहे. शहारातील उच्चशिक्षित नागरिक जसे स्थानिक पायाभूत सुविधांबाबत जागरुक आहेत. तसेच जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी आग्रही आहे.

खासदार तेजस्वी सूर्या यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘न्यू इंडिया व्हिजन’ ऐकण्याची पर्वणी या निमित्ताने पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध झाली आहे. ‘‘लोकल टू ग्लोबल कनेक्ट वुईथ तेजस्वी सूर्या’’ असा हा कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

भारतीय संसद भवनामध्ये आणि राजकीय क्षेत्रात आपल्या घणाघाती आणि अभ्यासपूर्ण वत्कृत्वशैलीमुळे अल्पावधीत युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेले देशातील युवा नेतृत्व म्हणून खासदार तेजस्वी सूर्या यांची ओळख आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूर्या यांचे अनेकदा कौतूक केले आहे. फाईव्ह ट्रिलिअन इकॉनॉमी, स्टार्ट अप इंडिया, स्कील इंडिया, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा भारत, जी-२० मधील भारताचे प्रतिनिधीत्व, गुड गर्व्हनन्स, डीजिटल इंडिया, भारतीय अर्थसंकल्प, तरुणांच्या अपेक्षा आदी विषयांवर तेजस्वी सूर्या यांचा प्रभावी अभ्यास आहे.

‘न्यू इंडिया व्हिजन’च्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकारच्या समन्वयाने पिंपरी-चिंचवडमध्ये कशाप्रकारे विविध विकासकामे नियोजित आहेत, याबाबत ऊहापोह या कार्यक्रमाद्वारे होणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा ; स्टिंग ऑपरेशननंतर आले होते चर्चेत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.