पुणे Crime : घटस्फोटानंतरही पत्नीकडून ”लैंगिक” इच्छापुर्तीची अपेक्षा ठेवणाऱ्या पतीच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २९) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Crime)
सदर प्रकार या कालावधीत घडला
याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेचा घटस्फोटित पतीच्या विरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२२ ते २७ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मशास्त्राच्या नियमांप्रमाणे खुलानामा (मुबारातनामा) करून रितसर कागदोपत्री फारकत घेतली. त्यानंतर फिर्यादी महिला गेल्या आठ महिल्यांपासून त्यांच्या आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत विभक्त राहत आहेत.
दरम्यान, आरोपी याने फिर्यादी महिलेकडून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा ठेवून फिर्यादी महिलेचा फोनव्दारे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. व्हाटसअपव्दारे अश्लील मेसेजेस पाठवून फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच फिर्यादी महिलेवर अचानक जिवघेणा हल्ला करण्याची भिती घातली. त्यामुळे फिर्यादी महिला आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य दहशतीखाली आहेत.
आरोपी हा फिर्यादी महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू घडवून आणण्याची किंवा त्यांना जबर दुखापत करण्याची आरोपी व्हाटसअपवरून सतत भिती घालत आहे. असे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिडीतेनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : शस्त्राचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…!
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून कासारवाडी व चिंचवड येथे लैंगिक अत्याचार…!