Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शांतता ! पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहतूक पोलिस वसुलीत व्यग्र आहेत…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 February 2025, 16:54

लोणी काळभोर, ता. २4 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वारगेट ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. चौकाचौकात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याऐवजी ते ये-जा करणारे शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्य नागरिकांकडून पठाणी वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत असून वाहतूक विभागातील पोलिसांचे काम वाहतूक नियमन की वसुली असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

 

पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वारगेट चौक, सेवन लव्ह चौक, पुलगेट,रेस कोर्स सर्कल, हडपसर गाडीतळ, 15 नंबर चौक, कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक यादरम्यान दररोज प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, सध्या वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी ऑनलाईन दंड व पावत्या फाडण्यात दंग आहेत. त्यामुळे सोलापूर, लातूर, दौंड, यवत, इंदापूर परिसरातून येणाऱ्या दुचाकी, चारचाकी सह अवजड वाहने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

मार्च एन्ड जवळ आल्याने सध्या वाहतूक पोलिसांकडून पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वारगेट ते उरुळी कांचन दरम्यानच्या अनेक चौकामध्ये दररोज सर्रासपणे वसुली सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदरची कारवाई आणि वाहन तपासणी मोहिमेत विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे आदी नेहमीच्याच सुमार आणि ढोबळ कारणांसाठी ठरलेली 500 ते 1500 रुपयांपर्यंत पावती फाडत आहेत. त्यातून सामान्यांना मात्र विनाकारण त्रास होत असून राजकीय पक्षाचा लोगो लावलेल्या गाड्या, काळ्या काचा लावलेल्या आणि सर्रास नियमभंग करणाऱ्या उच्चभ्रूंच्या चारचाकी, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या अशी वाहने मात्र सहीसलामत पावतीतून सुटत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

दुसरीकडे सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत. प्रसंगी अनेक वाहनधारकांना हुज्जत घालून अपमानीत करत आहेत. विशेष म्हणजे यात अनेक वाहनधारकांची कुठलीही चूक नसताना हा आर्थिक फटका त्यांना नाहक सहन करावा लागत आहे. रस्त्यावर एका बाजूला उभे राहून वाहतूक पोलीस सर्वसाधारण वाहनधारकांना हेरुन ते समोर जाताच अचानक त्यांच्या वाहनाचा फोटो काढून मोठा दंड आकारतात असा अनुभव सध्या अनेकांना दररोज येत असल्याचा तक्रारी आहेत.

वाहतुक नियमनाकडे दुर्लक्ष?

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दैनंदिन छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याची दुरवस्था व वाहतूक कोंडी याचा अगोदरच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांनी वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली वाहतूक नियमनाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कवडी पाट टोलनाक्यांच्या आजूबाजूला घोळक्याने उभे असलेले पोलिस रस्त्याच्या मध्यभागी येऊन वाहने अडवत वसुली करत आहेत. त्यातून अनेकांना वाहनचालकांची घाबरगुंडी उडते आणि त्यांच्या अपघाताची शक्यता वाढते.

‘वसूली’ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?

दरम्यान मार्च एन्डच्या नावाखाली होणारी दंडात्मक कारवाई अनेकदा ‘तोडपाणी’ करून प्रकरण मिटविण्यातच खर्च होते असा वाहनचालकांचा अनुभव आहे. त्यातून सरकारी तिजोरी कमी आणि आपला खिसा जास्त भरण्याचा प्रकार होत असल्याचा नागरिकांचा आणि वाहनचालकांचा आरोप आहे. असे भ्रष्ट वाहतूक पोलिस आपल्या खात्याच्या नावाखाली स्वतःचीच तुंबडी भरत असल्याचे वास्तव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का? व या ‘वसूली’ कर्मचाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होणार ? याकडे सामान्य पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post
FIR registered against two people for selling land without owner consent

शिक्रापुरात हक्कसोड केलेल्या जमिनीची परस्पर विक्री; मायलेकांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.