Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगडमध्ये जमिनीच्या वादातून शेतकर्‍याच्या तरुण मुलीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न, मुंबई येथील कुख्यात गुंडांकडून दहशतीचा प्रयत्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 May 2024, 21:52
teachers beats man in shirur pune

राजगड: भाटघर धरण खोर्‍यातील पसुरे येथील जमिनीच्या वादातून एका ब्रिगेडियरने बंदुकीतून दोन फैरी झाडत स्थानिक शेतकर्‍यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच बुधवार २९ मे रोजी राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथे जमिनीच्या वादातून एका शेतकर्‍याच्या एकवीस वर्षीय मुलीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून याबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

प्रणाली बबन खोपडे ( वय.२१, रा.कोंढावळे खुर्द, ता.राजगड) असे हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणी व तिची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मात्र, याबाबत वेल्हे पोलिसांत अद्यापही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत तक्रारदार मुलीची आई कमल खोपडे म्हणाल्या, मी आणि माझ्या दोन मुली प्रणाली व प्राजक्ता बुधवारी (ता.२९) कोंढावळे खुर्द येथील गट नंबर ११४ मधील शेतात काम करीत होतो. त्यावेळी संभाजी खोपडे याने या ठिकाणी पंधरा ते सोळा गुंडांबरोबर जेसीबी व ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका, असे म्हटले. यावेळी माझी मुलगी प्रणाली हिने विरोध केल्याने तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कमल खोपडे यांनी वेळीच हस्तक्षेप करीत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या मदतीने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले. या प्रकरणी प्रणाली व तिची आई कमल यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली आहे.

या घटनेमध्ये मुंबई शिवडी येथील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल उर्फ राजू भैय्या घटनास्थळी उपस्थित होता. त्याने या ठिकाणी दहशत निर्माण करून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधित मुलीला गाडण्याचा प्रयत्न करत दुसर्‍या महिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी वेल्हे पोलिस दखल घेत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज गुरुवार (ता.३०) रोजी कमल बबन खोपडे व प्रणाली खोपडे यांनी पुणे अधीक्षक कार्यालय येथे धाव घेतली. याबाबत वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, या प्रकरणी दोन्ही बाजूकडून तक्रार अर्ज दाखल झाले असून योग्य तो तपास करून चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात येतील.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Sunetra Pawar

Pune : सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेची राज्य सरकार घेणार पूर्ण काळजी! जीवाला धोका असल्याच्या पत्राची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Sunday, 12 April 2026, 15:28

प्रेमसंबंधातून सूड! महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; लोणी काळभोर पोलिसांकडून आरोपीला अटक

Sunday, 12 April 2026, 15:01
Thrill on Kikvi-Kenjal road! What did Pune residents see on their way to work in the morning? Fear grips the area

किकवी-केंजळ रस्त्यावर थरार! सकाळी कामावर निघालेल्या पुणेकरांना वाटेत असं काय दिसलं? परिसरात भीतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 14:52

“बॉटलिंग प्लान्ट”च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा! लोणी काळभोर पोलिसांकडून बाप-लेक जेरबंद

Sunday, 12 April 2026, 14:47

पुण्यात महिला सुधारगृहाचा थरार! १३ बांगलादेशी मुलींचा केअरटेकरवर हल्ला अन् फिल्मी स्टाईल पलायन; पहा धक्कादायक व्हिडीओ

Sunday, 12 April 2026, 14:30
Asha Bhosale

Asha Bhosale : यशाचे शिखर, पण वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर; आशा ताईंचा थक्क करणारा जीवनप्रवास

Sunday, 12 April 2026, 14:11
Next Post
Pune court asks Rahul Gandhi to appear on August 19 in Savarkar defamation case

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, सावरकरांविरोधात केलेलं वक्तव्य अंगलट येणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.