Monday, March 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahar Watan Land: काय आहे ‘महार वतन जमीन’? पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून चर्चेत आलेल्या वतन जमिनीचा इतिहास आणि कायदा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 6 November 2025, 22:24
Mahar Watan Land: What is 'Mahar Watan Land'? The history and law of the ancestral land that came under discussion due to Parth Pawar's land transaction

Photo-Social Media

पुणे: ‘महार वतन’ हा शब्द पुन्हा (Mahar Watan Land) एकदा राज्याच्या (Pune News) राजकीय चर्चेत आला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने खरेदी केलेली पुण्यातील तब्बल 40 एकर जमीन ही ‘महार वतन’ असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नेमकं हे ‘महार वतन’ म्हणजे काय, अशा जमिनींचा व्यवहार कसा होतो आणि त्यावर कोणत्या कायदेशीर अटी लागू होतात, या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

ब्रिटिश काळात शासनाची सेवा करणाऱ्या महार समाजातील लोकांना त्यांच्या सेवेसाठी मोबदला म्हणून जी जमीन कायमस्वरूपी देण्यात आली, तिला ‘महार वतन जमीन’ म्हटलं जातं. त्या काळी या जमिनी वतनदारांना इनामस्वरूपात देण्यात येत असत. या जमिनींचा उपयोग शासनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींकडून संदेशवहन, सुरक्षा आणि गावातील विविध सरकारी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी केला जाई.

मात्र, या वतन व्यवस्थेमुळे समाजात होणारा भेदभाव आणि अन्याय लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने 1958 मध्ये ‘वतन निर्मूलन कायदा’ लागू केला. या कायद्यानंतर अशा सर्व जमिनी शासनाच्या ताब्यात घेतल्या गेल्या आणि वतनदार कुटुंबांना ठराविक मोबदला देण्यात आला.

यानंतर 1963 मध्ये या जमिनी ‘भोगवटादार वर्ग 2’ म्हणून पुन्हा माजी वतनदारांच्या नावावर करण्यात आल्या. मात्र, या जमिनींच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे अटींचं उल्लंघन झाल्यास जिल्हाधिकारी अशा जमिनी सरकारकडे परत जप्त करू शकतात.

या जमिनींच्या विक्रीवेळी जिल्हाधिकारी जमीन मूल्यावर आधारित 20 ते 50 टक्के नजराणा रक्कम आकारतात. तसेच, अशा जमिनी केवळ ठरवलेल्या उद्देशासाठीच वापरता येतात. वतन आणि इनाम जमिनींचे सात प्रकार पूर्वी प्रचलित होते. सरंजाम, जात इनाम, देवस्थान इनाम, देशपांडे-देशमुख इनाम, परगणा इनाम, रयत उपयोगी इनाम आणि सरकार उपयोगी इनाम (जसे महार किंवा रामोशी इनाम).

पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी घेतलेल्या जमिनीचा प्रकार आणि तिच्या कायदेशीर पात्रतेबाबत आता मोठं राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जुनी वतन जमीन व्यवस्था आणि तिचे कायदेशीर पैलू जनतेसमोर आले आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

IND vs WI T20 World Cup 2026

IND vs WI T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजला संजू भारी! 196 धावांचा डोंगर ‘सॅमसन’ वादळात उडाला; वेस्ट इंडिजला नमवून टीम इंडिया ‘सुपर-8’ मधून थेट सेमीफायनलमध्ये

Sunday, 1 March 2026, 23:13
Education News

Education News : पालकांनो लक्ष द्या! तुमच्या पाल्याचा पहिलीचा प्रवेश आणि शाळा मार्चमध्येच; जाणून घ्या शिक्षण विभागाचा नवा निर्णय.

Sunday, 1 March 2026, 22:53
Israel us And Iran War

Israel us And Iran War : आखाती देशांत युद्धाचा भडका; विमानसेवा ठप्प, भारतीय नागरीकांची परतीसाठी धडपड म्हणाले “आम्ही सुरक्षित आहोत, पण…”

Sunday, 1 March 2026, 22:37
Crime

Crime : ३०० लोकांचा जमाव, लाठ्या-काठ्या अन् धुडगूस! कला केंद्राची तोडफोड; १० गाड्या फोडल्या, महिलांचा जीव थोडक्यात वाचला.

Sunday, 1 March 2026, 21:22
Agriculture News

Agriculture News : पिकवणाऱ्याच्या मेहनतीवर फिरवला कोयता! शेतकऱ्याचं १० लाखांचं नुकसान; अज्ञाताने दोन एकर केळीची बाग जमीनदोस्त

Sunday, 1 March 2026, 20:13
Mumbai

Mumbai : महिला कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता कामाच्या ठिकाणी छळ करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचलले मोठे पाऊल.

Sunday, 1 March 2026, 19:59
Next Post
Pune News: PMC has prepared strict rules for demolishing old mansions and buildings in Pune; Know what are the new rules

Pune News: पुण्यातील जुने वाडे आणि इमारती पाडण्यासाठी PMC ने तयार केली कठोर नियमावली; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.