Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील जुने वाडे आणि इमारती पाडण्यासाठी PMC ने तयार केली कठोर नियमावली; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 6 November 2025, 23:01
Pune News: PMC has prepared strict rules for demolishing old mansions and buildings in Pune; Know what are the new rules

Photo-Social Media

पुणे: पुण्यातील जुने वाडे आणि इमारती (Pune News) पाडताना पर्यावरण (Pune Construction) आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या नियमावलीला मंजुरी दिली असून, तिची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात येणार आहे. या नियमांनुसार, पाडकामाच्या वेळी धूळ, आवाज आणि प्रदूषण यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच अपघात होण्याची शक्यता टाळावी, असा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे.

 

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील अनेक जुने वाडे आणि उपनगरांतील जुन्या इमारती आता नव्या बांधकामांसाठी पाडल्या जात आहेत. मात्र, या प्रक्रियेसाठी आजवर कोणतीही ठोस नियमावली नव्हती. त्यामुळे पर्यावरण प्रदूषण, सुरक्षिततेचा अभाव आणि मनमानी पाडकाम यांसारख्या समस्या वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन अशा नियमावलीची मागणी केली होती.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, इमारत पाडण्यापूर्वी संबंधित विकासकाने त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक आहे. पाडकाम करताना धूळ उडून प्रदूषण होऊ नये म्हणून जागेवर पाणी मारणे किंवा स्प्रिंकलर प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक आहे. तसेच, पाडकामाच्या वेळी परिसरातील इतर इमारतींना धोका असेल, तर तेथील रहिवाशांना तात्पुरत्या ठिकाणी हलवावे.

इमारतीभोवती किमान 25 फूट उंचीचे लोखंडी पत्रे बसविणे, पोलिस ठाणे, अग्निशमन दल आणि शेजारच्या सोसायट्यांना लेखी स्वरूपात माहिती देणे हे नियम देखील बंधनकारक करण्यात आले आहेत. पाडकामानंतर निर्माण झालेला राडारोडा सुरक्षित स्थळी हलवताना त्यावर हिरव्या कापडाचे आच्छादन असणे आवश्यक आहे. तसेच, पाडकामाचे फोटो महापालिकेकडे सादर करणे आणि संबंधित स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून काम पूर्ण झाल्याचा अहवाल देणेही बंधनकारक आहे.

मनसेचे हेमंत संभूस यांनी सांगितले की, आतापर्यंत जुन्या इमारती पाडण्याच्या कामात स्थानिक गुंड आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ‘माफियाराज’ निर्माण झाला होता. मात्र, आता महापालिकेच्या नव्या नियमावलीमुळे या प्रकारांवर आळा बसेल. त्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांनी या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे का, यावर स्वतः लक्ष ठेवावे, अशी मागणीही केली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Pune News: PMC has prepared strict rules for demolishing old mansions and buildings in Pune; Know what are the new rules

TET Exam: टीईटी परीक्षेसंदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये- अनुराधा ओक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.