Friday, March 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikalbhor : लोणी काळभोरच्या कन्या प्रशालेचा जिल्ह्यात डंका; शिष्यवृत्ती परीक्षेत 54 विद्यार्थिनींचे घवघवीत यश

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 13 March 2026, 16:39
Lonikalbhor

photo- ppn

Lonikalbhor : राष्ट्रीय अर्थ कम गुणवत्ता शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात आपला ठसा उमटवला आहे. प्रशालेचा तब्बल 99 टक्के निकाल लागला असून तब्बल 54 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशामुळे कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींचा जिल्ह्यात दबदबा निर्माण झाला असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अर्थ कम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत लोणी काळभोरच्या कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला. यशस्वी विद्यार्थिनींना शिक्षक अरविंद राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

एनएमएमएस परीक्षा एकूण 180 गुणांची असून त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश असतो. या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 9 वी ते 12 वीपर्यंत दरवर्षी केंद्र सरकारकडून 15 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय केंद्राच्या गुणवत्ता यादीव्यतिरिक्त ‘सारथी’च्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशानिमित्त शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक अरविंद राठोड यांचा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सीताराम गवळी व मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थिनींना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी बाळासाहेब दौंडकर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांना 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. तसेच विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख हिंगणे, शिक्षणप्रेमी जे. पी. नाना कदम, दादा पाटील काळभोर, प्राचार्य मंजुळकर , प्रा. गायकवाड सर, सूर्यवंशी सर, वंदनाताई राजकुमार काळभोर, हर्षदा कुंभारकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील पी. डी. यांनी केले तर आभार पाटील व्ही. व्ही. यांनी मानले

दरम्यान, विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशामुळे लोणी काळभोर परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गुणवंत विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे

समीक्षा सुहास कुंभार (143), श्रद्धा उमेश माने (136), ज्ञानेश्वरी राहुल चव्हाण (136), लक्ष्मी परमेश्वर माने (129), श्रेया जितेंद्र खराडे (125), हिंदवी राजू ननवरे (125), स्वराली नवनाथ बधे (123), वैभवी बाळू तावरे (112), वैष्णवी विठ्ठल कदम (122), जिक्राशामुदिन पिरजादे (119), गौरी पोपट चव्हाण (119), संस्कृती बंडू विघ्ने (118), वैष्णवी सुनील कोळपे (117), सारिका रंगराव येवते (116), राजश्री संभाजी जायेभाये (114), वैभवी प्रकाश शिंदे (113), साक्षी परशुराम कलाल (112), दीप्ती दत्तात्रय गोडगे (111), आलिया आरिफ मोगल (110), सई अनिल गिरी (108), जान्हवी मंगेश चव्हाण (108), सानिया रियाज शेख (107), चेतली चिदानंद स्वामी (106), श्रेया सिद्धार्थ येवतीकर (105), समीक्षा वैभव व्होनमाने (104), सई विशाल काळभोर (104), साक्षी भागवत काळे (104), सानिध्या विजय काळभोर (100), जानवी समाधान राऊत (98), तनिष्का विकास काळभोर (98), संस्कृती महेश चांदणे (97), सोनम महादेव भोसले (96), राजलक्ष्मी धनराज गणदास (95), तमन्ना जाकीर शेख (94), पलक नवनाथ मगर (94), साक्षी राकेश कामठे (94), मानसी संजय जाधव (93), गायत्री प्रवीण चव्हाण (93), श्रुती संजय भांड (93), सृष्टी राहुल मुळे (92), अमृता उद्धव सातपुते (91), पूनम लक्ष्मण काळे (91), विद्या विजय बच्छिरे (88), वैष्णवी नवनाथ पावणे (87), लावण्या लक्ष्मीकांत काळभोर (87), ऐश्वर्या सुमेध कांबळे (86), तन्वी शंकर इंदलकर (86), वर्षा सतिश बिक्कड (85), रोशनी गजानन उतपुरे (83), कल्याणी राजेश कुंभारकर (79), वैष्णवी मोहन काळभोर (78), ऋतुजा संतोष काळभोर (77), रिया सुखदेव गळवे (77) आणि सुप्रिया तुकाराम चव्हाण (77).

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Sunetra Pawar: Sunetra's sister-in-law's "Janata Darbar" in Baramati! Crowd at "Sahayog" since early morning; On-the-spot solution to the problems of "beloved sisters"

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा वहिनींचा “जनता दरबार”! पहाटेपासूनच “सहयोग”वर गर्दी; “लाडक्या बहिणीं”च्या समस्यांवर ऑन द स्पॉट तोडगा

Friday, 13 March 2026, 17:55
Crime

Crime : तरुणीवर कोयत्याने वार करून तरुण पसार, जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं त्या भीषण रात्री?

Friday, 13 March 2026, 17:05
Lonikalbhor

Lonikalbhor : लोणी काळभोरच्या कन्या प्रशालेचा जिल्ह्यात डंका; शिष्यवृत्ती परीक्षेत 54 विद्यार्थिनींचे घवघवीत यश

Friday, 13 March 2026, 16:39
Daund News: Midnight terror in Daund! Three unknown thieves entered the house from the terrace; Property worth Rs. 2.25 lakhs looted

Daund News: दौंडमध्ये मध्यरात्री थरार! तीन अज्ञात चोरटे गच्चीवरून घरात घुसले; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

Friday, 13 March 2026, 16:20
Uruli Kanchan News: A man duped a land developer in Uruli Kanchan of Rs 12 crores by promising a 10 percent return.

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथील लँड डेव्हलपरला 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवून एकाने घातला 12 कोटींचा गंडा

Friday, 13 March 2026, 15:59
uruli kanchan

uruli kanchan : वळती येथे ट्रॅक्टर अपघातात शिंदवणे येथील चालकाचा मृत्यू ; एकजण जखमी

Friday, 13 March 2026, 15:56
Next Post
Crime

Crime : तरुणीवर कोयत्याने वार करून तरुण पसार, जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं त्या भीषण रात्री?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.