Loni Kalbhor : पेरणी फाटा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमअनुयायी येतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खाजगी इंटरनेट सेवा बंद करण्यात येत आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे. (Loni Kalbhor)

पुढे बोलताना राजेंद्र पन्हाळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य गृह विभागाचे अतिरिक्त सचिव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजगी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शौर्य दिनाच्या दिवशी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची व तरडे या गावांमध्ये इंटरनेट सुविधा आज बुधवारी (ता.31) रात्री बारा वाजता बंद होणार आहे. व उद्या गुरुवारी (ता.1) रात्री अकरा वाजता पुन्हा इंटरनेट सुविधा पूर्ववत होणार आहे. (Loni Kalbhor)







