Pimpri Chinchwad : पीएसीएल (PACL) कंपनीच्या मालमत्तेची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पांडुरंग पवार यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने पीएसीएल कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही, मुख्य आरोपी चंद्रकांत सांगलीकर व इतर नऊ जणांनी संगनमत करून सुमारे १३ हेक्टर क्षेत्रफळाची, अंदाजे २७ कोटी रुपयांची मालमत्ता विकल्याचा आरोप आहे. (Pimpri Chinchwad)

या प्रकरणी सी.आर. क्रमांक ३७५/२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४१९, ४२०, ४६५ आणि ४६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी चंद्रकांत सांगलीकर याला काल रात्री आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय घाटे व त्यांच्या पथकाने अटक केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







