Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरबसल्या मिळणार पालखी सोहळ्याचं लाईव्ह ट्रॅकिंग; पुणे पोलिसांची नवीन सेवा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 June 2025, 17:54

आयुष्यात प्रत्येकानं अनुभवावा असा असतो आषाढी वारीचा पालखी सोहळा. मात्र अनेकदा कामाच्या व्यापामुळे किंवा इतर अडचणींमुळे प्रत्यक्ष हजर राहून हा अनुभव घेणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेक भाविक सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसूनच पालखी सोहळा पाहतात. पालखी ज्या मार्गाने जाते, त्या मार्गावर वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून विविध रस्त्यांमध्ये बदल केले जातात. काही ठिकाणी पार्किंगची विशेष व्यवस्था केली जाते, तर काही ठिकाणी ती बदलली जाते. अशा वेळी वाहतूक, रस्ते बंद, पार्किंग व्यवस्था यासंदर्भातील सगळी अपडेट्स कुठे आणि कशी मिळवायची, असा प्रश्न अनेकांना पडतो. याच समस्येवर पुणे पोलिसांनी यंदा एक स्मार्ट उपाय शोधून काढला आहे.

 

पुणे पोलिसांकडून यंदा संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गाचं लाईव्ह ट्रॅकिंग सुरू करण्यात आलं आहे. पालखी पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यामुळे त्या भागातील ट्रॅफिक अपडेट्स, रस्त्यांमधील बदल, पार्किंग व्यवस्था यासंदर्भातील सगळी माहिती पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरून थेट लाईव्ह दिली जाणार आहे. पालखी या क्षणी नेमकी कुठे आहे, वाहतूक कशी आहे, कोणते रस्ते बंद आहेत आणि कुठे डायव्हर्जन करण्यात आले आहे, याबाबत घरबसल्या एका क्लिकवर माहिती मिळणार आहे.

यासाठी पुणे पोलिसांच्या diversion.punepolice.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर “Live Tracking” हे पर्याय निवडल्यावर तुम्हाला पालखीचा संपूर्ण मार्ग नकाशावर दिसेल. या नकाशावर झूम इन किंवा झूम आउट करून तुम्ही सध्याचे अपडेट्स पाहू शकता. ज्या रस्त्यांवर वाहतूक बंद आहे, तेथे लाल रंगाचं मार्किंग करण्यात आलं आहे. जिथे वाहतुकीचं डायव्हर्जन आहे, तेथे हिरव्या रंगाचं चिन्ह दाखवण्यात आलं आहे. तसेच, जिथे पिवळ्या रंगाचं घड्याळ दिसतं तिथे त्या क्षणाचं ताजं अपडेट उपलब्ध आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या यंदाच्या वेळापत्रकानुसार, १९ जून रोजी आळंदीहून माऊलींची पालखी प्रस्थान करत आहे. २० जून रोजी पालखी आळंदीहून पुण्यात पोहोचेल. २१ जून रोजी पुण्यात मुक्काम असेल. २२ जूनला पुण्याहून सासवडकडे प्रस्थान होईल आणि २३ जूनला सासवडमध्ये मुक्काम असेल. २४ जून रोजी सासवडहून जेजुरी, २५ जूनला जेजुरीहून वाल्हे, २६ जूनला वाल्हेहून लोणंद आणि २७ जून रोजी माऊली पालखी लोणंदहून तरडगावकडे प्रस्थान करेल.

पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या या डिजिटल सुविधेमुळे आता पालखी सोहळ्याशी संबंधित सगळी माहिती मिळवणं अधिक सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक झालं आहे. घरबसल्या श्रद्धेचा अनुभव घेण्यासाठी हे एक उत्तम माध्यम ठरणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन व छत्रपती शिवाजी महाराज पालखी रिंगण सोहळा साजरा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.