Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon News : महात्मा गांधीचे नेतृत्व म्हणजे मानवी सभ्यतेचे भविष्य; प्रा. के. डी. कांचन यांनी जागवल्या बापूजींच्या सहवासातील आठवणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 October 2023, 16:36

गणेश सुळ

Kedgaon News : केडगाव : मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व, असे म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात. त्यासाठी आपले नेतृत्व कसे आहे, याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळी संपूर्ण जगात हिंसा सुरू होती, त्यावेळी महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला. हिंसा म्हणजे अंधःकाराचा मार्ग आहे. अहिंसक मार्गाने निर्माण झालेले नेतृत्व हे शाश्वत असते, असे मत ज्येष्ठ गांधीवादी नेते प्रा. के. डी. कांचन यांनी व्यक्त केले.

सुभाष कुल महाविद्यालय व खादी ग्रामोद्योग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती कार्यक्रम

केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय व खादी ग्रामोद्योग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी नेते प्रा. के. डी. कांचन यांनी महात्मा गांधीजींच्या सहवासात असतानाच्या उरुळी कांचन येथील आठवणींना उजाळा दिला.

 

प्रार्थना चालू असताना व्हॉइस रॉयचे ब्रिटिश अधिकारी गांधीजींना घेऊन जाण्यास आले असताना ‘मी प्रार्थना झाल्याशिवाय तुमच्यासोबत येणार नाही’ असे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले व दुसऱ्या दिवसाची प्रात: प्रार्थना झाल्यानंतर गांधीजी ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत मार्गस्थ झाले. (Kedgaon News) अशा प्रकारच्या अनेक आठवणी के. डी. कांचन यांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितल्या.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी आजच्या काळामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी, जागतिक सहजीवनासाठी गांधी विचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले. आजच्या विस्कळीत समाज जीवन व राजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी गांधी विचारांची कास धरायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद थोरात यांनी आजच्या तरुणांच्या स्वप्नांची सांगड गांधीजींच्या स्वप्नांशी जर घातली तर देशाचा विकास विधायक पद्धतीने होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. तसेच हा देश कोणा श्रीमंत व्यक्तीचा नसून, तो कायमच गांधीजींचाच असणार आहे असे ठामपणे सांगितले. (Kedgaon News) खादी ग्रामोद्योग भवनचे गणेश ढवळे यांनी खादीचे महत्त्व विशद करताना खादी देशभक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांनी महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान स्पष्ट केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चरख्यावर सूत कताई करण्यात आली तसेच महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित काही चित्रे प्रदर्शित करण्यात आली. (Kedgaon News) या कार्यक्रमाचे आयोजन भानुदास ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, डॉ. अनुराधा गुजर, डॉ. अशोक दिवेकर, डॉ. मनीषा जाधव, डॉ. विशाल गायकवाड, अमोल शेलार, डॉ. महादेव थोपटे, प्रियंका थोरात, चैताली दिवेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्याम वासनीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. शोभा वाईकर यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Kedgaon News : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी संस्थांनी थकीत कर्जात सवलत द्यावी; दूष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची मागणी

Kedgaon News : धक्कादायक! लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आईनेच केला पोटच्या मुलीचा निघृण खून; दौंडमध्ये खळबळ

Kedgaon News : “पोस्टमन नामदेव गवळी यांच्या पाठपुराव्याला यश.. “; TATA AIG व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा ३९९ रुपयांचा दहा लाखांचा अपघाती विमा कुटुंबियांना सुपूर्त ;

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Mumbai News : यंदा पोहे अन् मैद्यासह मिळणार 'आनंदाचा शिधा'; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अजित पवार यांची अनुपस्थिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.