Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon News : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी संस्थांनी थकीत कर्जात सवलत द्यावी; दूष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 12 September 2023, 14:37

गणेश सुळ

 

Kedgaon News : केडगाव : पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबरचे दहा दिवस उलटूनही तालुक्यातील ओढे, नाले, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाऊस नसल्याने पिके जळून जात आहेत. यातच डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील इतर बँका रिझर्व बँकेच्या अधीन राहून थकीत कर्जासंबंधी विविध तरतुदी करत असते. परंतु पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी संस्थेकडून कोणतीही तरतूद केली जात नाही. बॅंकेने शेतकऱ्यांना सवलत दिल्यास, शेतकऱ्याचा कर्जाचा भार कमी होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

बॅंकेने शेतकऱ्यांना सवलत दिल्यास, कर्जाचा भार कमी होईल, अशी अपेक्षा…..

यापूर्वीही शेतकऱ्यांना निसर्गाच्या दुष्टचक्राचा सामना करावा लागला आहे. कोविड १९ हा आजार, लाळीच्या विषाणूचा प्रादूर्भाव, लंपी आजार, शेतमालाला कवडीमोल भाव, पुन्हा दुष्काळजन्य परिस्थिती… यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याने आता जगावे की मरावे, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

अपुर्‍या पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. पिकाला सध्या पाण्याची गरज आहे. पाऊस नसल्याने जिरायती भागातील शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. अपुर्‍या पावसामुळे विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. बागायती पट्टा म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. पिकांचे उत्पादन घटले असून, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या चार्‍याची समस्या भेडसावू लागली आहे. हिरवा चारा कमी पडू लागला आहे. त्याचा परिणाम दुग्धोत्पादनावर होत आहे. पावसाने मारलेली दडी शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर परिणाम करू लागली आहे. यासाठी या सहकारी बँकांनी व सहकारी संस्थांनी शेतकरी वर्गासाठी पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज परतफेड करण्यासाठी विविध तरतुदी राबवणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.

याबाबत बोलताना दौंड तालुक्यातील एकेरीवडी येथील शेतकरी भरत टकले म्हणाले की, सर्व राष्ट्रीयीकृत बँका शेतकरी पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज परत फेडीसाठी विविध तरतुदींमधून सवलत देते. परंतु सहकारी बँक, सहकारी संस्थांकडून कोणतीही सवलत दिली जात नाही. शासन निर्णयानुसार मुदतवाढ दिलेला जीआर तरी अंमलात आणावा व अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाला योग्य ती सवलत द्यावी, अशी आमची मागणी आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

Saturday, 2 May 2026, 19:12

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

Saturday, 2 May 2026, 19:02

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 2 May 2026, 18:27

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

Saturday, 2 May 2026, 17:29
Next Post

Pune News : दाजीचा खून करून मेव्हण्याची गळफास घेऊन आत्महत्या ; पुण्यातील धक्कादायक घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.