Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karmala Election: धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय – सावंत गटाचा करमाळ्यात दणदणीत यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 15:32

प्रतिनिधी सागर घरत

 

Karmala Election:  करमाळा: करमाळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सावंत गटाने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवले आहे. सावंत गटाच्या सौ. मोहिनीताई संजय (पप्पू) सावंत यांनी भाजपच्या सुनिता देवी यांचा तब्बल १८३१ मतांनी पराभव करत नगराध्यक्षा पदावर विजय मिळवला. या निवडणुकीत सावंत गटाचे एकूण आठ नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्षा धरून संख्या ८+१ झाली आहे.

निवडणुकीनंतर प्रतिक्रिया देताना सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी हा विजय “धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय” असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर सावंत गट भाजपमध्ये प्रवेश करणार, या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “आमचा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे जनतेचा पक्ष.” अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा- ऐ बिड्डा ये मेरा अड्डा! पुणे जिल्ह्यात ‘दादां’चा जलवा; 17 पैकी 10 नगरपालिका काबीज, बारामती, इंदापूर अन् जेजुरीवर अजित पवारांचाच झेंडा

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मोठी राजकीय यंत्रणा असूनही अपेक्षित यश मिळू शकले नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा नगर परिषद ‘दत्तक’ घेतल्याची घोषणा केली होती, मात्र तरीही भाजपला नगराध्यक्ष पदासह अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भाजपसाठी ही निवडणूक आत्मचिंतनाची ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनीदेवी जगताप यांचा पराभव झाला. तसेच त्यांचे पुत्र, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप हे देखील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगताप यांच्यासाठी विजयाचे आव्हान दिले होते, तरीही शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही.

नगरपरिषदेतील पक्षनिहाय संख्या
सावंत गट : ८ + १ (नगराध्यक्षा)
भाजप : ७
शिवसेना : ५

प्रमुख पराभव

या निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी नगरसेवक राहुल जगताप, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, तसेच अनेक माजी नगरसेवक व प्रमुख नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्वच राजकीय जाणकारांचे अंदाज फोल ठरले आहेत.
करमाळा नगर परिषद निवडणूक निकालाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, येत्या काळात स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

ख्रिसमस पार्टीसाठी हॉटेलमधून कशाला मागवता? घरच्या घरी झटपट तयार करा हे 5 चटपटीत पदार्थ; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.