Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News: फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत राऊंडसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 13 September 2025, 21:58
fursungi news

फुरसुंगी : “एक गावठी पिस्तूल व एक जिवंत राऊंड” असा साठा बाळगणाऱ्या दोन सराईतांना फुरसुंगी पोलिसांच्या (Fursungi News) तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींकडे बेकायदेशीररीत्या शस्त्रसाठा सापडल्याने त्यांच्यावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नसीम उमर मोहम्मद अनसारी (वय – 37, रा. वडगावशेरी, हडपसर पुणे), व राकेश जानी सकट (वय 25, रा. तावडीवाडी रोड, उर्से, पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 12) संध्याकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी तपास पथकातील अंमलदार हेमंत कामथे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, हांडेवाडी रोड ग्रिन हील हॉटेल जवळील कात्रज बायपास रोडवर उरुळी देवाची (ता. हवेली) येथे दोन इसम संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे विनापरवाना पिस्टल सारखे हत्यार असण्याची शक्यता आहे,

सदरची माहिती वरिष्ठांना कळवून घटनास्थळी पंचासह जावुन बातमीप्रमाणे दोन संशयित इसम थांबल्याचे दिसुन आले, त्यांना पोलीस स्टाफने झडप घालुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं वरीलप्रमाणे सांगितले.

 

नसीम उमर मोहंमद अन्सारी याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत राउंड मिळून आला, त्याच्या सोबत असलेल्या राकेश सकट याने देखील त्याच्या साथीदारासोबत येण्याबाबत समाधानकारक माहीत दिली नाही, तसेच त्यांच्याकडे हत्यार बाळगण्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे दिसुन आले, त्यामुळे सदर हत्यार घटनास्थळीच पंचनाम्याने जप्त करण्यात आले, व संशयितांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला येऊन त्यांचा अभिलेख तपासला असता सदर आरोपी हे पुणे शहरातील रेकॉर्डवरील गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगार असल्याचे दिसुन आले.

दरम्यान, दोन्ही आरोपींविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर शस्त्र कायदा कलम 3(25) व 35, तसेच भादंवि कलम 37(1)(3), 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख हे करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, हरी कदम, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजीत टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमण, नितीन सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post
Purandar News

Purandar News: भरदिवसा घरावर दरोडा, पोलीस अन् ग्रामस्थांचा सिनेस्टाईल पाठलाग, ड्रोनचा वापर; पुरंदर तालुक्यात काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp