Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election : अजित पवारांचा डाव, शरद पवारांचा काढता पाय… जागावाटपावरून पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात बिनसलं; बैठकीत नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 12:17
election

photo- social media

Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी चर्चा सुरू होती. पण शुक्रवारी झालेल्या बैठकीत ही चर्चा अक्षरशः फिसकटली. जागावाटपावरून अजित पवार आणि शरद पवार गटात एकमत झालं नाही आणि अखेर बैठक अयशस्वी ठरली.

 

नेमकं घडलं काय?

अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी खासदार वंदना चव्हाण आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यात पुण्यात जागावाटपावर चर्चा झाली. मात्र अजित पवारांनी एक अट घातली-सगळ्या उमेदवारांनी ‘घड्याळ’ या चिन्हावरच निवडणूक लढवायची. शिवाय शरद पवार गटाला फक्त ३५ जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. (election)

हा प्रस्ताव शरद पवार गटाला मान्य नव्हता. त्यामुळे त्यांचे नेते बैठकीतून उठून बाहेर पडले. याचाच अर्थ पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता तूर्तास तरी संपली, असं स्पष्ट झालं.

यानंतर शरद पवार गटाने लगेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी संपर्क साधला. रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये या तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, आमदार बापू पठारे, विशाल तांबे, अश्विनी कदम, मनाली भिलारे उपस्थित होते. काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, अभय छाजेड तर ठाकरे गटाकडून गजानन थरकुडे, संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी हजेरी लावली. बैठक रात्री उशिरापर्यंत चालली, मात्र जागावाटपावर नेमकं काय ठरलं, याची माहिती समोर आली नाही.

दरम्यान, मनसेनंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “भाजपला हरवण्यासाठी जर मूळ महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येत असतील, तर आम्हीही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत,” असं मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी सांगितलं. मात्र जागावाटपावर स्वतंत्र चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा चर्चेत आहे. अजित पवार गटासोबत जाण्याला त्यांनी विरोध केल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला होता. आता मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, असं चित्र स्पष्ट होत असताना, “महाविकास आघाडीच होणार होती,” असं जगताप यांचं म्हणणं खरं ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या राजकीय खेळात प्रशांत जगताप यांचा बळी गेला, अशीही चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35
Next Post
Fire

Fire : आजऱ्यात भीषण अग्नितांडव; दुकाने आणि वाहने आगीच्या विळख्यात, कोट्यवधींची राख रांगोळी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.