Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा ; माता रमाई यांची आज जयंती, जाणून घ्या त्यांचे जीवनचरित्र…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 7 February 2023, 10:33

पुणे : प्रत्येक यशस्वी महापुरुषांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा असतो, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाबाई तथा रमाई आंबेडकर होय. रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जवळील वणंद या गावी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ अशी भावंडे होती. रमाई लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले.

 

मुंबईतील भायखळा मार्केटमधील मासळी बाजार येथे बुधवार ४ एप्रिल १९०६ रोजी रमाईचे भिवासोबत लग्न झाले. रमाईच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका! पण रमाईच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. रमाबाई संसारात रमल्या, परंतु भीमराव पुस्तकांत. बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचनात दंग असत.

बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही. आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्यात. कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता नाही. अथांग दु:खाचे कधी भांडवल केले नाही.

घरातील आर्थिक संकटाचा कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही. एका मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही. रमाईची तर एकापाठोपाठ तीन मुलगे आणि एक मुलगी औषधपाण्याविना तडफडून मरण पावले. म्हणूनच रमाईच्या त्यागाची थोरवी गाताना कवी यशवंत मनोहर म्हणतात, ‘रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय, जीवनाचा तो एक संपूर्ण दु:खाशय होता.’

बाबासाहेब व रमाबाई राजगृहात राहत असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते. बाबासाहेबांनी धारवडच्या वराळे या आपल्या मित्राकडे काही दिवसासाठी रमाईला पाठविले. वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवित होते. त्यांच्या आवारात लहान मुले नेहमी खेळायला येत असत. दोन-चार दिवसांत रमाईला त्या लहान मुलांचा लळा लागला. दोन दिवस झाले मुले आवारात दिसली नाहीत, म्हणून रमाईने काकांना विचारले.

काका म्हणाले की, मुले तीन दिवसांपासून उपाशी आहेत. वसतिगृहाला अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळालेले नाही. हे सांगताना वराळे काकाचा कंठ दाटून आला. तत्क्षणी रमाईने कपाटातील डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या, या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा, पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा. यावर बाबासाहेब काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभरही विचार केला नाही. सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान ठरली. अशिक्षित असूनही बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला साजेशी आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता रमाईत होती.

कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण रमाईत असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते. रमाईच्या त्यागाविषयी बाबासाहेब ‘बहिष्कृत भारत’मध्ये लिहितात, ‘आपण परदेशी असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला ती अजूनही करावी लागत आहे. मी स्वदेशी परत आल्यावर माझ्या विपन्नावस्थेत शेणाचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहण्यातही जिने मागेपुढे पाहिले नाही अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तासही मला घालविता येत नाही.’ बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही खंत मन हेलावून टाकते. १९४० मध्ये लिहिलेला ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ बाबासाहेबांनी रमाईला अर्पण केला आहे.

अर्पणपत्रिकेत ते लिहितात, ‘हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याचे शुद्धत्व आणि याशिवाय त्या काळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शाविली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण केला आहे.’

दरम्यान, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही.

मुंबई येथे २७ मे १९३५ रोजी रमाईचे निधन झाले. रमाई व तिच्या अपूर्व त्यागाला पुणे प्राईम न्यूज चा सलाम…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

लोणी काळभोर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मयूर काळभोर यांना मातृशोक....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.