Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor : बनेश्वर गार्डनमधील खेळणी धोकादायक अवस्थेत; शौचालयांची दुरवस्था आणि सुविधांचा अभाव-पर्यटनाच्या प्रतिमेला धक्का

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 19:50
Bhor

photo- ppn

भोर | प्रतिनिधी 

 

Bhor : भोर तालुक्यातील ऐतिहासिक आणि पुरातन बनेश्वर मंदिर परिसर हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, कुटुंबीय आणि लहान मुले येथे भेट देतात. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी मोठे गार्डन असून मुलांसाठी झोके, घसरगुंड्या व इतर खेळणी साहित्य बसवण्यात आले आहे. मात्र सध्या या सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय व धोकादायक झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. (bhor)

घसरगुंड्या फाटलेल्या, झोके तुटण्याच्या स्थितीत

बनेश्वर गार्डनमधील घसरगुंड्या अनेक ठिकाणी फाटलेल्या पत्र्यामुळे खराब झाल्या असून काही ठिकाणी पत्रे वर आलेली आहेत. यामुळे मुलांना गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढला आहे. झोक्यांच्या साखळ्या जागोजागी गंजलेल्या व खराब झाल्या असून बसण्याची पत्रेही तुटलेली व कमजोर अवस्थेत दिसून येतात. (bhor)

पर्यटक व पालकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण असून अनेक जण मुलांना खेळण्याकडे पाठवताना घाबरत आहेत. “मुलांसाठी खेळणी आहेत, पण ती वापरण्याची हिंमत होत नाही,” अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

शौचालयांची दुरवस्था; रोज साफसफाई व दुरुस्तीची गरज

या परिसरात पर्यटकांची संख्या मोठी असतानाही शौचालयांची स्थिती समाधानकारक नाही, अशी तक्रार पर्यटकांकडून वारंवार केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ही पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असून येथे शौचालयांची नियमित दुरुस्ती व रोजची साफसफाई होणे गरजेचे आहे.

पर्यटकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यास पर्यटनस्थळाची प्रतिमा मलीन होऊन भविष्यात पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वनविभागाची पाहणी झाली, पण कृती नाही

या संदर्भात वनविभागाशी संपर्क साधला असता त्यांनी “आम्ही पाहणी केली असून लवकरात लवकर नवीन साहित्य बसवू,” असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. मात्र कित्येक दिवस उलटून गेले तरी प्रत्यक्षात सुधारणा दिसून आलेली नाही.

यामुळे पर्यटकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत असून “फक्त आश्वासनं मिळतात, काम मात्र होत नाही,” अशी भावना व्यक्त होत आहे.

कात्रज सर्प उद्यानासारखा उपक्रम बनेश्वरमध्येही सुरू करावा-पर्यटन वाढीस चालना मिळेल

पर्यटन वाढीसाठी केवळ गार्डन व मंदिर परिसर इतक्यावर मर्यादित न राहता प्रशासनाने कात्रज सर्प उद्यानाच्या धर्तीवर येथेही मुलांना पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी काहीतरी आकर्षक उपक्रम सुरू करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

उदा.

निसर्ग व वन्यजीव माहिती केंद्र

पक्षी निरीक्षण विभाग

लहान प्राणी/वन्यजीव जनजागृती कक्ष

मुलांसाठी शैक्षणिक निसर्ग प्रदर्शन

पर्यावरणपूरक “मिनी नेचर पार्क”

असा उपक्रम सुरू झाल्यास पर्यटनाला नवी दिशा मिळून बनेश्वर परिसरात पर्यटकांची संख्या अधिक वाढू शकते, तसेच स्थानिक रोजगारालाही चालना मिळू शकते.

वनविभाग, वन समिती व ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलावीत

या प्रकरणाकडे वनविभाग नसरापूर, वन समिती नसरापूर तसेच ग्रामपंचायत नसरापूर यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
पर्यटनस्थळावर सुरक्षितता आणि सुविधा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, तातडीने पुढील गोष्टी करण्यात याव्यात-

1. धोकादायक झोके व घसरगुंड्या त्वरित काढून नवीन बसवणे

2. संपूर्ण खेळणी साहित्याची तपासणी करून दुरुस्ती/बदल करणे

3. शौचालयांची दुरुस्ती करून रोजची साफसफाई अनिवार्य करणे

4. नियमित देखभाल व सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे

5. कात्रज सर्प उद्यानासारखा आकर्षक उपक्रम येथे सुरू करणे

प्रशासनाला जाग येणार कधी?

बनेश्वरसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर जर मुलांच्या खेळण्याची सुरक्षितता आणि शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असेल, तर पर्यटन विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच राहतील. आता तरी प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करून पर्यटकांना सुविधा व सुरक्षितता उपलब्ध करावी, अन्यथा पर्यटकांचा विश्वास कायमचा ढासळण्याची शक्यता आहे.

पर्यटन टिकवायचं असेल, तर सुरक्षितता, स्वच्छता आणि आकर्षक सुविधा-या तिन्ही बाबींवर तात्काळ कृती गरजेची आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Pune Politics: BJP-Shiv Sena's farewell letter to 'Ajit Dada' in Pune? New plan of 'unity' by leaving out NCP in Zilla Parishad; What happened in the core committee meeting?

Pune Politics: पुण्यात भाजप-शिवसेनेची 'अजित दादां'ना सोडचिठ्ठी? जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला डावलून 'युती'चा नवा प्लॅन; कोअर कमिटीच्या बैठकीत काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.