Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् कोंढणपूर फाट्याने घेतला मोकळा श्वास; शरद पवार येणार असल्याने राजगड वाहतूक पोलिसांनी मोकळा केला रस्ता

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 7 May 2025, 18:24

महेंद्र शिंदे

 

खेड-शिवापूर, ता. 7 : “एरवी कोंढणपूर फाट्यावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर उभी राहणारी वाहने, भाजी विक्रेते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याकडे राजगड वाहतूक पोलिस सोईस्कर दुर्लक्ष करत होते. मात्र बुधवारी या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येणार असल्याने बुधवारी पोलिसांनी कोंढणपूर फाट्यावरील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे, वाहने हटवली. त्यामुळे बुधवारी कोंढणपूर फाट्याने मोकळा श्वास घेतला. अशा प्रकारे पोलिसांनी रोज याठिकाणी लक्ष दिले तर येथील वाहतूक कोंडी कायमची सुटेल,” असे मत स्थानिक नागरीक व्यक्त करत आहेत.

पुणे-सातारा रस्त्यावरील कोंढणपूर फाटा हे कायम वर्दळीचे ठिकाण आहे. पश्चिम हवेली आणि भोर तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. तसेच याठिकाणी बाजारपेठ असल्याने मोठी वर्दळ असते. मात्र येथील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कायम गर्दी असते. भाजी विक्रेते तसेच वाहने उभी केली जात असल्याने उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कायम वाहनांची कोंडी व्हायची. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते.

पुलाखालील या गर्दीतून वाट काढताना पीएमपी बस तसेच अवजड वाहनांना मोठी कसरत करावी लागत असे. तरीही या गंभीर प्रकाराकडे राजगड वाहतूक विभाग सोईस्कर दुर्लक्ष करत असत. मात्र बुधवारी या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे समजताच राजगड वाहतूक विभाग जागा झाला.

बुधवारी पुलाखालील भाजी विक्रेते दिसेनासे झाले, तेथे उभी राहणारी वाहने दिसेनासी झाली. बाजुच्या दुकानांसमोर उभी राहिलेली वाहने दिसली नाहीत. जणू कोंढणपूर फाट्याने बुधवारी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ राजकीय लोक येणार असतील तरच नको तर सामान्य नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पोलिसांनी सदर ठिकाणी रोज लक्ष दिले तर कोणाचीही गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरीक व्यक्त करत होते.

बसथांबा झालाय भाजीचे दुकान

येथील कोंढणपूर फाट्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बस थांबा आहे. मात्र या बस थांब्यात अनेक भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी बसतात. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना रस्त्यात उभे राहावे लागते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32
Next Post

कोंढव्यात कंपनीतील किरकोळ वादातून सहकाऱ्याचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा ; काय आहे प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.