Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घुसखोर बांगलादेशींच्या सुटकेसाठी वकिलांचा पुढाकार; बनावट जामीन सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 20 July 2024, 19:21

पिंपरी : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. त्या आरोपींची सुटका करण्यासाठी वकिलाने बनावट जामीन पोलिसांना सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी वकीलासह इतर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडे दहा ते सहा वाजण्याच्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पिंपरी न्यायालय येथे घडला होता.

 

याबाबत राहुल बबन बनसोडे (रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.19) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला जामीन देण्यासाठी कर्टात हजर असलेले वकील आणि आरोपीच्या जामीनासाठी वकीलाच्या संपर्कात असलेले व्यक्ती (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. आरोपींच्या सुटकेसाठी न्यायालयाने स्थानिक जामीनदार, नातेवाईक आणि त्यांचे फोन नंबर सादर करायला सांगितले होते. आरोपींनी फिर्यादी यांचे बनावट आधार कार्ड तयार करुन ते न्यायालयात सादर केला. तसेच वकीलांमार्फत जामीन घेऊन तो पोलिसांना सादर केला. परंतु, फिर्यादी बनसोडे हे स्वत: न्यायालयात हजर नसतानाही त्यांच्या आधार कार्डचा वापर करुन आरोपींना जामीन देऊन न्यायालय व फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, राहुल बनसोडे यांनी आरोपींच्या जामिनाबाबत न्यायालयात जाऊन चौकशी केली असता फिर्यादी यांचे आधार कार्ड न्यायालयात स्थानिक जामिनदार म्हणून सादर केल्याचे निदर्शनास आले. मात्र, बनसोडे यांनी अशा प्रकारचे कोणतीही कागदपत्रे आरोपींना दिली नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर बनसोडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

यावरून आरोपींना जामीन मिळवून देण्यास मदत करणाऱ्या वकीलावर आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय रविंद्र मुदळ करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35
Next Post
MLA Mahesh Landge Akhad Party in bhosari pune

आमदार महेश लांडगे यांची ‘आखाड पार्टी’ जोरात सुरु! महोत्सवाच्या सुरूवातीलाच तुफान प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.