Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 16 August 2025, 20:20

लोणी काळभोर: येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अंजीर संशोधन परिषदेचे अध्यक्ष आप्पासाहेब काळभोर, तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश मेमाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

कार्यक्रमात इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले, तर 4 थीच्या विद्यार्थ्यांनी “ए मेरे वतन के लोगो” हे देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. इयत्ता 8 वीची तनिष्का जगताप हिने “तेरी मिट्टी…” या गाण्याने सर्वांची मने जिंकली. क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांजल काळभोरच्या नेतृत्वाखाली आर.एस.पी. ग्रुपने भव्य परेड सादर केली. दुर्गा लक्ष्मीच्या अश्वावर इयत्ता 7 वीची सृष्टी पायघन हिने स्वार होऊन परेड आकर्षण ठरली. इयत्ता 8 वीची विद्यार्थिनी तनिष्का जगताप या विद्यार्थिनीने “तेरी मिट्टी…” देशभक्तीपर गाण्यावर सुरेख आवाजात गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली.

शाळेचे नृत्य शिक्षक अश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ तिरंगा’ या गाण्यावर इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांनी आपली जन्मदाती आई व भूमीबद्दलची आस्था व निष्ठा नृत्या मधून सादर केली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्वातंत्र्यदिनाविषयी भाषणे केली. नृत्य व संगीताबरोबरच कराटे प्रशिक्षक प्रफुल्ल गायकवाड यांनी कराटे व स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली, तर दीपक शितोळे यांनी आकर्षक फलक लेखनाने लक्ष वेधले.

प्रमुख पाहुणे अप्पासाहेब काळभोर यांनी कृषी क्षेत्रातील यशस्वीतेची गाथा स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना सांगितली. तसेच इस्राइल या शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून या तंत्रज्ञानाच्या वापराने आळंदी म्हातोबा येथील खडक डोंगरावर फळबागेचे नंदनवन फुलवले असल्याची माहिती दिली. संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने फुलवलेल्या आपल्या शेतीला भेट देण्यासाठी त्यांनी विद्यार्थी व पालकांना आमंत्रित केले.

दरम्यान, यावेळी रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नितीन काळभोर, स्कूलच्या सेक्रेटरी मंदाकिनी काळभोर, रेनबो स्कूलच्या प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्या प्रशांत लाव्हरे, सुपरवायझर पायल बोळे, रेनबो किड्स कायझन स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर, प्रथमेश काळभोर, रामदास काळभोर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री सुरवसे व पार्थ सुभेदार यांनी केले तर आभार प्रदर्शन उदय कदम यांनी केले. या सोहळ्यास मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

रांजणगाव गणपतीत येथे आठ प्रवाशांना चाकू अन् कोयत्याचा धाक दाखवून 85 हजारांचे दागिने पळविले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.