Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीला विकासाच्या नावाखाली बकाल करणाऱ्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल, मतदारांचा कौल जनसेवा पॅनेलाच – राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु काळभोर…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 December 2022, 11:05

विशाल कदम

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील पाच वर्षात फक्त स्व:ताच्या तुंबड्या भरल्या आहेत. आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे स्वता:च्या नावावर खपवली आहेत. कदमवाकवस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी जनता आम्हालाच कौल देईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु काळभोर यांनी व्यक्त केला आहे.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत हनुमान मंदिराच्या परिसरात जनसेवा पॅनेलने नारळ फोडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ चा प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आला. यावेळी बोलताना वरील विश्वास नंदु काळभोर यांनी केले.

 

यावेळी जनसेवा पॅनेलचे प्रमुख यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर यांच्यासह अरुण काळभोर, सुभाष कदम, बाबासाहेब काळभोर, सुनील नाना कदम, बाळासाहेब कदम, स्मिता नॉर्टन, ऋषिकेश काळभोर, देविदास कदम, प्रितम काळभोर, निलेश काळभोर, सचिन काळभोर, पांडा काळभोर, प्रा. राजेश काळभोर, बाळासाहेब गायकवाड, शरीफमामु खान, सुरेश गायकवाड, राजाराम दळवी, योगेश घुले, विजय थोरात, शेखर काळभोर, सुरेश चांदणे, जयसिंग घाडगे, दिलीप दोडके, सुशील काळभोर, अश्वित काळभोर, विलास कदम, प्रदीप गुजर, जयशिंग चंद, दादा चिंतामण घाडगे, पांडुरंग कदम, संजय चांदणे, नितीन टिळेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना नंदू काळभोर म्हणाले, सत्ताधारी पॅनलने जनतेला समानतेची वागणूक दिलेली नाही. त्यांच्या मर्जीनुसार कामे केली आहेत. सत्तेसाठी व भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ताधारी पॅनल कोणत्याही थराला जाऊन गलिच्छ राजकारण करेल. परंतु, मतदार राजा आता सुज्ञ आणि जागरूक झाला असून तो त्यांना त्यांची योग्य जागा निश्चित दाखवेल. तर जनसेवा पॅनल हा सर्वसामान्य जनतेचा पॅनल आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पॅनल निवडून आणण्यासाठी नागरिकांनी जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन काळभोर यांनी यावेळी केले आहे.

यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर म्हणाले, सत्ताधारी पॅनलने सीएसआर फंडाच्या माध्यमातून गावात विकासाची कामे केली नाहीत तर ती कामे अगलबगलच्या सहकार्यांच्या कंपनीला देऊन ”फक्त खुदका आणि उनका विकास” करून जनतेची फसवणूक केली आहे.

तसेच कदमवाकवस्ती गावाला केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ८९ कोटीच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजुरी मिळाली आहे. कोणत्याही गावाची लोकसंख्या आणि शासकीय विकासाच्या निकषावर हा निधी शासनाच्या वतीने दिला जातो. मात्र सत्ताधारी हे विनाकारण श्रेय त्यांना घेत आहे. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी सत्तांतर होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, आरपीआय व इतर सर्व पक्ष एकत्र आले आहेत.

यावेळी बोलताना सरपंचपदाच्या उमेदवार कल्पना काळभोर म्हणाल्या, कदमवाकवस्तीच्या सर्वागीण विकासासाठी आपल्या घरातील, कुटुबांतील एक महिला उमेदवार म्हणुन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मतदारांनी संधी दिल्यास, पुढील पाच वर्षात जनतेची सेवा करण्यासाठी निपक्षपणे कटिबद्ध राहणार आहे. तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत ही जिल्हात विकासाचे एक मॉडेल म्हणुन ओळख होईल. असे काम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

जनसेवा पॅनेलचे प्रभाग निहाय उमेदवार पुढील प्रमाणे :
सरपंच पदासाठी उमेदवार- कल्पना बाबसाहेब काळभोर
प्रभाग क्रमांक १ – अर्चना हेमंत टिळेकर, नेहा बाबासाहेब चव्हाण, विशाल विठ्ठल गुजर
प्रभाग क्रमांक २ – रेश्मा नंदकुमार काळभोर, शीतल नितेश लोखंडे, स्मिता निलेश काळभोर ,
प्रभाग क्रमांक ३ – शहाजी कांतीलाल मिसाळ, संगीता राजाराम दळवी,

प्रभाग क्रमांक ४ – बिस्मिला शमी शेख, नंदू कैलास काळभोर, दत्तात्रय भिमराव वाघमारे
प्रभाग क्रमांक ५ – स्मिता गुरुदत्त काळभोर, मयूर सुरेश कदम, अमित वसंत कदम
प्रभाग क्रमांक ६ – श्रीकांत नारायण भिसे, अर्चना श्रीकांत कदम, मनीषा राजेश काळभोर,

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

जळगाव दूध संघावर कुणाचा झेंडा ? गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वर्चस्वासाठी टक्कर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.