Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahesh Landge News : मोशीत क्रिकेट स्टेडियमसह आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल! आमदार महेश लांडगे यांच्या सुचनेची आयुक्तांकडून अंमलबजावणी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 July 2023, 19:43

Mahesh Landge News  पिंपरी : मोशी येथील क्रिकेट स्टेडिअमसह आता आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने लेखाशीर्षात बदल केला आहे. (Mahesh Landge News)

भाजपा आमदार तथा शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी अंमलबजावणी केली असून, महासभेमध्ये संबंधित प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. Mahesh Landge News

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘औद्योगिक नगरी’, ‘कामगारनगरी ’ अशी आहे. भविष्यकाळात ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून शहराचा लौकीक व्हावा. या हेतूने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अभियानांतर्गत स्केटिंग ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट, भोसरी मल्टीपर्पज स्पोर्ट्स गॅलरी, मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीकेंद्र, बास्केटबॉल मैदान, टेनिस कोर्ट आणि हॉलीबॉल, जलतरण तलाव, प्ले ग्राउंड आदी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

सन २०१९ पासून मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारण्यात येत आहे. प्रशासनाने स्टेडिअमच्या कामासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च आणि लेखाशिर्षाला मंजुरी दिली आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी, शहरामध्ये ‘चऱ्होली-चिखली-मोशी हा रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे.

 

शहरात विकासाच्या सर्वाधिक संधी असलेला हा परिसर नावारुपाला येत आहे. त्या अनुशंगाने या परिसरात निर्माण होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमला वर्षभरातील आठ ते दहा महिने प्रेक्षकांची गर्दी होण्यासाठी हा प्रकल्प केवळ स्टेडिअम म्हणून नव्हे, तर सर्वप्रकारच्या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय क्रीडा संकुल म्हणून विकसित करावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली होती.

तसेच, यासंदर्भात लेखाशिर्षामध्ये बदल करावा व बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलाच्या धर्तीवर ‘‘आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूल’’ विकसित करण्यासाठी व्यापक लेखाशिर्ष करावे. ज्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली होती. आता नगरसचिव विभागाच्या मान्यतेने बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती मिळणार आहे.

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले कि, मोशी आरक्षण क्रमांक १/२०४ येथे क्रिकेट स्टेडियमसह बहुउद्देशीय क्रीडा संकुल निर्मिती झाल्यास या मैदानावर प्रेक्षकांची वर्षातील किमान सात ते आठ महिने गर्दी राहणार आहे. प्रेक्षकसंख्या वाढल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, महापालिका प्रशासनाच्या महसुलातही भर पडणार आहे. त्यामुळे लेखाशीर्ष व्यापक करून क्रिकेट स्टेडियम आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुल विकसित करावे, अशी सूचना केली होती त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01

स्वारगेटपासून आंबेगावपर्यंत खाकीचा महा-दणका! ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ सराईत तडीपार

Sunday, 13 September 2026, 19:46

अन् त्यानं दारूच्या पैशांसाठी चक्क दानपेटी फोडली! नशेची तलफ भागवायला देवाचे सोन्याचे डोळे चोरले; तरुणाचं विचित्र कृत्य

Sunday, 13 September 2026, 19:11

झटपट श्रीमंतीच्या नादात महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले; मैत्रिणीवर ठेवला आंधळा विश्वास अन् तिनेच दिला दगा….

Sunday, 13 September 2026, 18:25

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44
Next Post

MLA Rahul Kul : शालेय स्तरावरती बंद असलेला वॉटर वेल पुन्हा नव्याने सुरू करा - आमदार राहुल कुल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp