बिहार: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात घडलेली (Viral News) ही घटना अक्षरशः चित्रपटातील प्रसंगासारखी (Bihar News) वाटावी अशी आहे. 23 नोव्हेंबरला विवाह झालेल्या एका नववधूने लग्नानंतर काहीच दिवसांत नवऱ्याला धक्का देणारा निर्णय घेतला. 27 नोव्हेंबरला ती पतीसोबत माहेरी आली होती. परत सासरी जाण्याची वेळ आली तेव्हा तिने नवऱ्याला सांगितले की, मी रिकाम्या हाताने सासरी जाणार नाही, मार्केटमधून मिठाई घेऊन या. हा आवाज ऐकून पतीने काहीच संशय न बाळगता तिला सोबत घेऊन मार्केटमध्ये गेला.

मार्केटमध्ये आल्यावर नवऱ्याला मिठाई आणण्यासाठी दुकानात पाठवले. पण हा संपूर्ण प्रकार आधीपासून ठरवलेला होता, याची त्याला कल्पनाच नव्हती. तो दुकानात शिरताच मागील बाजूने युवतीचा प्रियकर बाईक घेऊन आला. क्षणाचाही विलंब न करता नववधू प्रियकराच्या बाईकवर बसली आणि तिथून थेट पळून गेली. काही मिनिटांतच नवरा बाहेर आला, पण ती तिथे नव्हती. तो धावपळ करत तिला शोधू लागला.
तेवढ्यात त्याच्या मोबाइलवर पत्नीचा फोन आला. ‘तू कुठे आहेस?’ असा प्रश्न तो विचारणार एवढ्यात तिने शांतपणे उत्तर दिले “मी माझ्या जानूसोबत चालली आहे. मला तुमच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. घरच्यांच्या जबरदस्तीने लग्न केलं, पण आता माझं आयुष्य मी माझ्या प्रियकरासोबतच घालवणार आहे.
हे ऐकून नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तात्काळ सासरच्यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. नातेवाईक, गावकरी सगळेच या धक्कादायक घटनाक्रमाने गोंधळून गेले. या प्रकारामुळे नवऱ्याला पत्नीशिवाय एकट्याने घरी परतावे लागले. तरूणीने प्रियकरासोबत पळून जाण्याचा संपूर्ण प्लान आधीच तयार केला होता, असे नंतर समोर आले. सध्या या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.






